आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kinnar Meet And Holly Rally In Udaypur News In Marathi

उदयपुरात रंगले अखिल भारतीय किन्नर संमेलन, कलश यात्रेत थिरकले \'तृतीयपंथी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- राजस्थानातील गोगुंदा येथे अखिल भारतीय किन्नर संमेलनाचे मोठ्या दिमाखात उद्‍घाटन झाले. संमेलनात देशभरातील किन्नर (तृतीयपंथी) मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. उदरपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच किन्नर संमेलन होत असल्याचे आयोजक आशाबाईने सांगितले. त्यामुळे उदरपूर जिल्ह्यात सर्वत्र किन्नर संमेलन हाच चर्चेचा विषय ठरला आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी गोगुंदामधून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यात्रेत तृतीयपंथींनी लयबद्ध नाच केला. त्याच्यावर सहकार्‍यांवर हजारो रुपये उधळले.
आशाबाई म्हणाल्या, गुरु मोहनीबाईच्या स्मरणात या संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले असून, 15 एप्रिलपर्यंत सुरु राहाणार आहेत. संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनात देहरादूनच्या आमदार रजनी रावत यांच्यासह नेपाळ, दिल्ली, जयपूर, रतलाम, पाल तसेच देशातील अन्य राज्यातील किन्नर सहभागी झाले

कलश मिरवणुकीत थिरकणारे तृतियपंथी पाहा, पुढील स्लाइडवर क्लिक करून...