आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kinnar Meet And Holly Rally In Udaypur News In Marathi News In Marathi

तृतीयपंथींचे संमेलन: कलश यात्रेत थिरकणार्‍या किन्नरांची सरपंचांनी केली फळतुला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- राजस्थानातील गोगुंदा येथे इंद्रप्रस्थ मार्केटमध्ये भरलेले अखिल भारतीय किन्नर(तृतीयपंथी) संमेलन चांगलेच रंगात आले आहे. बुधवारी भव्य कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रेत लयबद्ध थिरकणार्‍या किन्नरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच गावाचे सरपंचांनी किन्नरांची फळतुला करण्यात आली.
महाराणा प्रताप राजतिलक चौकांतील महादेवजी यांच्या विहिरीजवळून कलश यात्रेला प्रारंभ झाला. मालिया चौक, प्रताप चौक, ठोकरा चौक, भैरूजी घाटी होत एक वाजता कलश यात्रा संमेलनस्थळी पोहोचली. प्रताप चौकात सरपंच घागुलाल मेघवाल व भैरूजीच्या घाटीत शंकर आचार्य यांनी किन्नरांचा फळतुला केली. कलश यात्रेत किन्नर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रात्री सांस्कृतिक कार्यक्रम..
अशोक सोनीने सांगितले की, रात्री 9 ते 11 वाजेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमानंतर गोगुंदा ज्वेलर्स असोसिएशनने सर्व किन्नरांना सत्कार केला.

दरम्यान, गुरु मोहनीबाईच्या स्मरणात या संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले असून, ते 15 एप्रिलपर्यंत सुरु राहाणार आहेत. संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. मुंबई, नेपाळ, दिल्ली, जयपूर, रतलाम, पाली, जोधपूर, सुरतसह देशभरातील प्रमुख गादीपती संमेलनात सहभागी झाले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कलश यात्रेत लयबद्ध थिरकणारे किन्नर...