आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राजस्थानमधील खजुराहो, रात्री गेले तर लोक होतात दगड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमधील खजूराहो - Divya Marathi
राजस्थानमधील खजूराहो
जयपूर/बाडमेर - मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिराची देशातच नाही तर जगात ख्याती आहे. तेथील स्थापत्य कलेचा नमुना राजस्थानमधील अनेक मंदिरांमध्येही पाहायला मिळतो. या मंदिरांच्या भिंतीवर प्रणय मुद्रेतील अनेक मूर्ती पाहायला मिळतात. अशी अख्यायिका आहे, की या मंदिरांना एका ऋषिने शाप दिला आहे, त्यामुळे सूर्य मावळल्यानंतर येथे जो कोणी थांबतो तो दगड होऊन जातो. कदाचित यामुळेच ही मंदिरे अज्ञात राहिली आणि खजूराहो ऐवढी प्रसिद्धी यांना मिळू शकली नाही.
बाडमेर मुनबाव रेल्वे मार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हथमा गावातील डोंगराच्या पायथ्याशी किराडू हे ठिकाण आहे. येथील शांतता अंगावर काटा आणणारी असते. दिवस मावळेपर्यंत येथे एखाद-दुसरे प्रेमी युगुल किंवा तरुणांचा ग्रुप फिरताना दिसेल परंतू सूर्यास्तानंतर हा परिसर निर्जण होऊन जातो.

कधीकाळी हा परिसर शिव, विष्णू आणि ब्रम्हदेवाच्या मंदिराने समृद्ध असल्याचे बोलले जाते. येथे दोन डझनपेक्षा जास्त मंदिरे होती, मात्र आता ती भग्नावस्थेत आहेत. फक्त पाच मंदिरे सुस्थितीत आहेत. त्यातील एक विष्णूचे आणि चार भगवान शंकराचे आहेत.

परमार राजाची होती राजधानी
एका शिलालेखावरील माहितीनूसार हा परिसर आणि हे क्षेत्र कधीकाळी अतिशय समृद्ध आणि विकसित होते. त्याचे नाव होते किरात कूप. परमार राजाचे हे राजधानीचे ठिकाण होते. 11 व्या शतकात या मंदिरांचे निर्माण करण्यात आले.
लोक पाषाण कसे होतात ?
इतिहासात डोकावले तर हा परिसर निर्जण होण्यामागे मोहम्मद घौरीचे आक्रमण असल्याचेही सांगितले जाते. तर दुसरीकडे असेही बोलले जाते, की मोगलांचे आक्रमण 14 व्या शतकात झाले आणि हा परिसर 12 व्या शतकातच एकांतात गेला होता. हा परिसर निर्जण होण्याची एक अख्यायिका प्रसिद्ध आहे.
ऋषिने दिला शाप
कथा अशी आहे, की एकदा एक ऋषि त्यांच्या शिष्यांसह किराडू आले आणि येथेच थांबले. काही दिवसानंतर ऋषिंना तिर्थयात्रेसाठी जायचे होते. त्यांनी गावातीलच काही लोकांकडे आपल्या शिष्यांची व्यवस्था लावून दिली आणि त्यांची काळजी घेण्यास सांगितले. ऋषि जेव्हा किराडूमध्ये परतले तेव्हा त्यांचे सर्व शिष्य विविध आजारांनी ग्रस्त होते. ते दृष्य पाहून ऋषि क्रोधीत झाले. गावकऱ्यांनी शिष्यांचा सांभाळ योग्य केला नाही असे त्यांना वाटले. येथील लोकांमध्ये मानवता नाही, हा परिसर मानव जातीसाठी राहाण्यायोग्य नाही, असे ते म्हणाले. मात्र एका कुंभारणीने एका शिष्याचा चांगला सांभाळ केला होता. ऋषिंनी कुंभारणीला सूर्यास्त होण्याआधी नगर सोडून जाण्यास सांगितले आणि शाप दिला की जी व्यक्ती सूर्यास्तानंतर येथे थांबेल त्याचा दगड होऊन जाईल. तेव्हापासून आजपर्यंत हा शाप लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे कोणीही येथे जाण्यास घाबरते.
सर्व फोटो - लाखाराम जाखड

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, का म्हणतात याला राजस्थानचे खजुराहो
बातम्या आणखी आहेत...