आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री स्कूटरवर निघाल्या किरण बेदी, म्हणाल्या - पुद्दुचेरी महिलांसाठी सुरक्षित आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण बेदी यांनी शुक्रवारी पुद्दुचेरीत सुरक्षेची पाहणी केली. - Divya Marathi
किरण बेदी यांनी शुक्रवारी पुद्दुचेरीत सुरक्षेची पाहणी केली.
पुद्दुचेरी - येथील लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी शुक्रवारी रात्री स्कूटरवर बसून सुरक्षेचा बंदोबस्त पाहायला निघाल्या. किरण बेदी म्हणाल्या की, पुद्दुचेरी रात्रीही महिलांसाठी सुरक्षित आहे. तथापि, त्यांनी पोलिसांना सल्ला दिला की सिक्युरिटी आणखी वाढवावी.
 
ट्विटरवर शेअर केला फोटो 
- किरण बेदी यांनी आपला फोटो ट्विटरवरही शेअर केला. त्यांनी लिहिले की, मला वाटते की पुद्दुचेरी रात्रीही महिलांसाठी सुरक्षित आहे. मी लोकांना अपील करते की गरज भासल्यास त्यांनी पीसीआरशी काँटॅक्ट करावा आणि 100 नंबर डायल करावा.
- शुक्रवारी रात्री स्कूटरवर सुरक्षा पाहिल्यानंतर किरण यांनी शनिवारी सायकलही चालवली. ट्विटरवर लिहिले, सुरक्षेची पाहणी केल्यानंतर शनिवारी स्वच्छतेची पाहणी करण्याकरिता राउंड लावला.
 
माध्यमांना पाठवला फोटो
- किरण बेदी यांनी आपला स्कूटरवरील फोटो व्हॉट्सअॅपवर माध्यमांना पाठवला. सोबतच लिहिले की, येथे महिला खूप सुरक्षित असल्याचे मला जाणवते.
बातम्या आणखी आहेत...