आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kishtwada Facing Communial Riots In Jammu Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये जातीय दंगलीमुळे तणाव कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यामध्ये जातीय दंगलीमुळे शनिवारी दुसर्‍या दिवशी संचारबंदी सुरूच ठेवण्यात आली. दंगलीच्या विरोधात जम्मू आणि शेजारी जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

कथुआतील सांबा, राजपोर, उधमपूर आणि गंगयाल भागात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. निदर्शकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. किश्तवाड व त्याशेजारील जिल्ह्यांमध्ये जातीय दंगलीविरोधात नागरिकांनी केलेल्या निदर्शनावेळी शुक्रवारी दोन ठार, तर 20 जण जखमी झाले हेाते. भाजपने पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. येथील अनेक दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. राज्य सरकारने बंदमुळे शाळा बंद ठेवल्या होत्या. यादरम्यान राज्यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

कथुआ, सांबा, रेसी, कातरा, उधमपूर, कातरा, चेन्नई, पूंछ, विजापूर, अखनूर, सुंदरबानी, बालकोत, नौशेरा, आर. एस. पुरा आणि रामनगर भागात जवळपास 100 टक्के बंद होता. भाडेवरा, राजाैरी, रामबान आणि दोडा भागात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.


गृहराज्यमंत्री कितचलू यांना हटवा
जम्मूमध्ये भाजप, बार असोसिएशन, विहिंप, शिवसेना आदी संघटनांनी सरकारविरोधी मोर्चा काढला. गृहराज्यमंत्री साजद अहमद कितचलू यांनी राजीनामा द्यावा, अशी मोर्चेकर्‍यांची प्रमुख मागणी होती. निदर्शकांनी जम्मूतील विविध भागांत टायर जाळून रस्ता वाहतूक रोखून धरली. निदर्शक कितचलूविरोधात घोषणाबाजी देत होते. दंगलीमागे कितचलू यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांना बडतर्फ करून अटक करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जुगलकिशोर यांनी केली. किश्तवाडमधील स्थिती सामान्य परंतु तणावपूर्ण असल्याचे जम्मूचे विभागीय आयुक्त शंतमनू यांनी सांगितले.