आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiss Of Love Protest Organiser And His Wife Arrested In Alleged Online Sex Racket

'किस ऑफ लव्‍ह'च्‍या आयोजक जोडप्‍याला अटक, चालवत होते सेक्‍स रॅकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोच्‍ची - सेक्‍स रॅकेट चालवण्‍याच्‍या आरोपात 'किस ऑफ लव्‍ह कँपेन'च्‍या आयोजक जोडप्‍यांसह एकूण आठ जणांना केरळ पोलिसांनी आज (बुधवार) सकाळी अटक केली. या व्‍यक्‍ती फेसबुक आणि इतर सोशल प्लेटफॉर्म्सच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवत असल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे. केरळ पोलिसाच्‍या सायबर सेलने सापळा रचून या प्रकरणाचा भांडाफोड केला.
नैतिक धोरण विरोधात राबवली चळवळ
'किस ऑफ लव्‍ह कँपेन'चा ऑर्गनायजर राहुल आणि त्‍याची पत्नी रश्‍मी नायर यांच्‍यासह इतर आठ जणांना पोलिसांनी अटक केली. त्‍यांनी आपली टीम बनवून संपूर्ण केरळमध्‍ये ऑनलाइन सेक्स रॅकेटचे जाळे विणले होते. या जोडप्‍याने गत वर्षी केरळमध्‍ये नैतिक धोरणाविरोधात चळवळ उभी केली होती. त्‍यासाठी त्‍यांनी फेसबुकवर एक फेजही तयार केले होते.
काय आहे 'किस ऑफ लव्‍ह' ?
केरळच्‍या कोझिकोडमध्‍ये एका कॅफेत प्रेमी युगुल अश्‍लील कृत्‍य करतात, असा आरोप करून एका संघटनेने गत वर्षी तोडफोड केली होती. एवढेच नाही तर प्रेमी युगुलांना बेदम मारहाणही केली होती. याच घटनेचा विरोध म्‍हणून 'किस ऑफ लव्‍ह' कँपेनला सुरुवात झाली. हळूहळू हे लोण केरळ बाहेरही पसरले. या कँपेनच्‍या माध्‍यमातून जोडप्‍यांना सार्वजनिक ठिकाणी खुलेआम ‘किस’ करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होतजे. या कँपेन पेजला गत वर्षी जवळपास 14 हजार लोकांनी लाइक केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'किस ऑफ लव्‍ह' कँपेनचे PHOTOS...