आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीसाठी धमकावले जाते, जेवणाचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या BSF जवानाने पत्नीला सांगितले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीला फोन करुन तेजबादूर यांनी त्यांच्या व्हिडिओनंतर आता त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली. - Divya Marathi
पत्नीला फोन करुन तेजबादूर यांनी त्यांच्या व्हिडिओनंतर आता त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली.
महेंद्रगड (हरियाणा) - सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) निकृष्ट जेवणाची तक्रार करणारा जवान तेजबहादूर याने नवा दावा केला आहे. जवानाने पत्नीला फोन करुन सांगितले, की आरोप मागे घेणे आणि माफी मागण्यासाठी  त्याला धमकी दिली जात आहे. तेजबाहादूर आणि त्यांच्या टेलिफोन बातचितचा ऑडियो divyamarathi.com ला मिळाला आहे. जवानाची पत्नी शर्मिला म्हणाल्या, 'माझे पती तेजबहादूर यांनी जे काही केले ते सत्य समोर आणण्यासाठी केले. लोक म्हणत आहेत की ते मनोरुग्ण आहे. असे जर असेल तर मग त्यांच्यावर उपचार का केले गेले नाही? त्यांना बॉर्डरवर का पाठवले?' बीएसएफचे कॉन्स्टेबल तेजबहादूर यांनी काही दिवसांपूर्वी चार व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केले होते. त्यात त्यांनी बर्फाळ प्रदेशात 11-11 तास ड्यूटी करणाऱ्या जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाचा जेवणाची माहिती दिली होती.  
 
 तेजबहादूर यांनी पत्नीला फोनवर काय सांगितले.. 
 - कॉन्स्टेबल तेजबहादूर यांनी पत्नीला फोन करुन सांगितले, 'मी अधिकाऱ्यांना फोन केला. माझी तक्रार आहे की अधिकारी माझे म्हणणे एकून घ्यायला तयार नाही. येथे घोटाळा होत आहे. आरोप मागे घेण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी मला धमकावले जात आहे. मला वाटते की माझे म्हणणे आहे की मीडियासोबत मला बोलू द्यावे, जेणे करुन मी माझी बाजू मांडू शकेल.'

पुढील स्लाइडमध्ये ऐका तेजबहादूर यांचे पत्नीसोबतचे संभाषण... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)