आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलच्या CEOची पत्नी, कधीकाळी सहा-सहा महिने होत नव्हते दोघांचे बोलणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर पिचाई यांची पत्नी अंजली. - Divya Marathi
सुंदर पिचाई यांची पत्नी अंजली.
कोटा (राजस्थान) - गुगल आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. कधी गुगल प्रॉडक्ट चीफ असलेले सुंदर यांनी आयआयटी खरगपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी (बी.टेक) घेतली आहे. चेन्नईमध्ये जन्मलेल्या सुंदर यांनी राजस्थानमधील कोटा येथे राहाणाऱ्या अंजलीसोबत लग्न केले आहे. गुगलच्या सीईओ पदी सुंदर यांची निवड होण्यामागे अंजलीचा सिंहाचा वाटा आहे. कारण जेव्हा ट्विटरने सुंदर पिचाई यांना जॉब ऑफर केला होता, तेव्हा पत्नीच्या सल्ल्याने त्यांनी गुगलमध्येच राहाण्याला प्राधान्य दिले होते.
सुंदर आणि अंजली यांची ओळख खरगपूर आयआयटीमध्येच झाली. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना सुंदरने अंजलीला प्रपोज केले होते. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सुंदर अमेरिकेला गेले होते, तेव्हा अंजली भारतामध्येच होती. सुंदर अमेरिकेला असताना भारतात असलेल्या अंजलीला रोज फोन करण्याएवढे पैसे त्यांच्याकडे नसायचे. अंजलीसोबत त्यांचे सहा-सहा महिने बोलणे होत नव्हते.

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुंदरने सेमीकंडक्टर फर्म जॉइन केली आणि अंजलीच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन त्यांनी लग्न केले. त्यानतंर दोघेही अमेरिकेला गेले. आज त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुंदर आणि अंजली यांचे काही निवडक फोटोज्..