आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS साठी समोर आली होती \'शिवाजी संघ\', \'जरीपटका मंडळ\' अशी नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या 75 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला RSS आणि डॉ. हेडगेवार यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. त्यातच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव कसे पडले आणि त्याची कामाची पद्धत नेमकी काय आहे? याबाबत आज आम्ही माहिती देणार आहोत.

आरएसएसच्या शाखांमध्ये डॉ. हेडगेवार, त्यांची कार्यशैली यावर रोज चर्चा होतात. डॉ. हेडगेवार कशाप्रकारे कठीण समयी एखाद्या समस्येवर तोडगा काढायचे याबाबत स्वयंसेवकांना माहिती दिली जाते. त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या वयोगटातील मुलांच्या मदतीने कामाला सुरुवात केली होती. पण देशासाठी एक गट सोबत घेऊन काम करणाऱ्या तरुण बळीराम हेडगेवार यांना असे वाटले की, एक संघटना बनवून जे काम करत आहोत, त्याला नावही असणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांनी याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली. कोणी शिवाजी संघ तर कोणी जरीपटका मंडळ अशी नावे त्यांना सुचवली. तर काही जणांनी हिन्दू स्वयंसेवक संघ नावही सुचवले होते. अखेच त्यांनी सर्वांचा सल्ला घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ठेवले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, RSS बाबत आणखी काही माहिती...