आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीम असा बनवायचा पुरुषांना नपुंसक, बाबाच्याच भक्ताने प्रेस घेऊन केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमने 400 जणांना नपुंसक बनवले होते. - Divya Marathi
राम रहीमने 400 जणांना नपुंसक बनवले होते.
चंदिगड - "बलात्कारी बाबाने आपली स्वत:ची एक सुरक्षा दलाची फौज बनवली होती आणि पंचकुला तसेच देशाच्या विविध भागाता राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर जी हिंसा उसळली त्यात याच फौजेचा हात होता." चंदिगड प्रेस क्लबमध्ये लायर्स फॉर ह्युमन राइट्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा धक्कादायक खुलासा अॅड. किरण सिंह यांच्या सोबत आलेल्या बलात्कारी बाबाचे सहयोगी आणि माजी समर्थक हंसराज ऊर्फ गुरदाससिंग तूर यांनी केला.
 
असा बनवायचा नपुंसक...
- हंसराज तथा गुरदाससिंग तूर म्हणाले की, ते 1996 पासून डेरा समर्थक होते आणि डेऱ्यातच राहायचे. 2002 मध्ये त्यांना धार्मिक भूलथापा मारून आणि बाबाने त्याच्या प्रभावात घेऊन ऑपरेशनने नपुंसक बनवले होते.
- या ऑपरेशनाच शरीरावर दुष्प्रभाव झाला आणि त्यांचे जीवन नरकापेक्षाही वाईट बनले. मग त्यांनी लगेच डेरा सोडण्याचा निर्णय घेतला.
- ते म्हणाले की, एकूण 400 लोकांना याच प्रकारे नपुंसक बनवण्यात आले. ज्यातील 166 लोकांची लिस्ट सीबीआयकडे आहे.
- हंसराज म्हणाले की, महिलांचे तेथे पूर्णपणे लैंगिक शोषण केले जायचे आणि कोणाला प्रेमाने तर कोणाला धाकाने राहायला मजबूर केले जायचे. भीतीमुळे कोणीच तोंड उघडत नव्हते. जो कोणी बोलण्याची हिंमत करायचा, त्याला गायब केले जात होते.
 
बलात्कारी बाबाकडे होती गुंडांची फौज
- बलात्कारी बाबाने गुंडांची एक फौज तयार केलेली होती. या फौजेला त्याने ग्रीन एस वेल्फेअर फोर्सचे नाव दिले होते. 2006 मध्ये यांची संख्या 20 हजारांपर्यँत होती. या लोकांना डेऱ्यामध्ये हत्यारांची ट्रेनिंग दिली जायची. आणि लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी तसेच दंगे करण्यासाठी वापरले जायचे.
- राम रहीमच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश करताना त्याचे माजी सहकारी राहिलेले गुरदास सिंग म्हणाले, छोट्या-छोट्या 16 वर्षांच्या मुलींनाही सोडले जात नव्हते, बाबा त्यांच्याशीही घाणेरडे काम करायचा.
 
टोपलंभर मिरची दीड कोटी रुपयांत...
- गुरदास सिंग म्हणाले, बलात्कारी बाबा श्रद्धेच्या नावावर लोकांना लुटत होता. आणि 15 किलो मिरचीची टोपली तब्बल दीड कोटीत विकत होता.
- यात गरीब माणसे 500 ते 1000 रुपयांत फक्त एक मिरची गुरूचा प्रसाद म्हणून विकत घ्यायचे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...