आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बादल कुटुंबातील एका महिलेकडेच 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती, सासरे CM-पती DCM दोघांकडे नाही कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखबीरसिंग बादल त्यांची पत्नी हरसिमरत कौर. - Divya Marathi
सुखबीरसिंग बादल त्यांची पत्नी हरसिमरत कौर.
चंदीगड - राजकारणात क्वचितच एखादे असे उदाहरण असेल ज्यांची संपत्ती वेगाने वाढलेली नाही. अशीच काही स्थिती पंजाबच्या बादल कुटुंबाची आहे. उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांची संपत्ती 2004 मध्ये फक्त 13 कोटी होती 2012 मध्ये ती 7 पटीने वाढली आणि 90 कोटी झाली. तर, त्यांच्या वडिलांची - प्रकाशसिंग बादल यांची संपत्ती 2007 मध्ये 9 कोटीवरुन कमी होऊन 6 कोटी झाली. तर, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्यी एकूण संपत्ती 108 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले.

आश्चर्याची बाब म्हणजे बाप-लेकाकडे कोणतीही कार नाही, दोघांकडे एक-एक ट्रॅक्टर 
- बादल कुटुंबावर आरोप लागतो की पंजाबातील खासगी वाहतूक व्यवस्थेवर त्यांचा ताबा आहे, मात्र निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात प्रकाशसिंग बादल आणि त्यांचे पुत्र सुखबीरसिंग यांच्याकडे एकही कार नसल्याचे म्हटले आहे.
- बाप-लेकाकडे एक-एक ट्रॅक्टर आहे, जे शेतीच्या कामासाठी वापरले जाते.
- प्रकाशसिंग यांनी 2012 मध्ये दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या ट्रॅक्टरची किंमत 3 लाख 25 हजार असल्याचे सांगितले होते, तर सुखबीरसिंग यांनी त्यांच्या ट्रॅक्टरची किंमत 2 लाख 68 हजार नोंदविली होती.
 
सुखबीर यांच्यावर 31 कोटींचे देणे 
- सुखबीरसिंग बादल यांना 2012 मध्ये 31 कोटी रुपये देणे होते. तर, त्यांच्या वडिलांवर एक रुपयाही कर्ज नव्हते.
 
उपमुख्यमंत्र्यांवर दाखल आहे खूनाचा गुन्हा 
- उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर 1  क्रिमिनल केस दाखल आहे. त्यांच्यावर अटेम्पट टू मर्डरच्या कलमानुसार खटला सुरु आहे. 
- तर त्यांच्या वडिलांनी 2012 मध्ये दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर एकही गुन्हा नाही.
2007 मध्ये मात्र त्यांच्यावर एक केस सुरु होती नंतर ती निकाली निघाली.
 
हरसिमरत कौर यांच्याकडे 5 कोटींचे दागिने 
- सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांच्याकडे पती पेक्षा जास्त दागिने आहे. सुखबीरसिंग यांच्याकडे फक्त 7 लाखांचे दागिने आहे तर, त्यांची पत्नी हरसिमरत यांच्याकडे 5 कोटी रुपयांचे दागिने आहेत. तर, प्रकाशसिंग यांच्याकडे फक्त 3 लाखांचे दागिने आहेत.
 
पित्याने मुलाला दिले 76 लाखांचे लोन 
- प्रकाशसिंग बादल यांनी मुलगा सुखबीरसिंग यांना 76 लाख रुपयांचे पर्सनल लोन दिले आहे.
 
26 कोटींचे आहे राहाते घर
- सुखबीरसिंग बादल यांच्या राहात्या घराची किंमत 26 कोटी रुपये आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे 5 शेत जमीनी आहे. त्यांची किंमत 17 कोटी रुपये आहे. त्यांच्या वडिलांकडे 4 कोटींची शेत जमीन आहे, 23 लाखांची कमर्शियल बिल्डिंग आणि 50 लाखांची निवासी इमारत आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बादल परिवाराची अधिक माहिती आणि फोटो...   
   
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...