कोलकाता - केरळमध्ये झालेल्या वादानंतरही गुरुवारी कोलकात्यात kiss of love आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या झालेल्या दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
जाधवपूर युनिव्हर्सिटी आणि प्रेसिडंसी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी याचे आयोजन केले होते. 'धार्मिक कट्टरवाद आणि कट्टरतेचा उदय' होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी रॅलीही काढली होती. यावेळी केरळमध्ये झालेल्या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात 'अमार शोरीर अमार मोन बंधो होक राज साशुन (हे माझे शरीर, माझे विचार आहेत, आणि मी कोणालाही मॉरल पोलिसींची परवानगी देत नाही)' अशा आशयाचे पोस्टर होते.
महाराष्ट्रातील घटनेचा उल्लेख
महाराष्ट्रात एका दलित मुलाची आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली आहे. kiss of love चे आयोजन करणा-यांनी या घटनेचा उल्लेख करत या घटनेचा विरोध करण्यासाठी आंदोलन आयोजित केल्याचे म्हटले आहे.
पुढे पाहा, कोलकात्यातील kiss of love चे फोटो...
(सर्व फोटो-kiss of love च्या फेसबूक पेजवरुन साभार)