आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स तस्कर बच्चा भाईला गोव्यात अटक: केरळ पोलिसांची कारवाई, गोवा पोलीस अनभिज्ञ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची- ड्रग्स व्यवसायामुळे बदनाम झालेल्या गोव्यातील दीपक कळंगुटकर उर्फ बच्चा भाई (48) नामक  एका इसमाला केरऴ कोची येथील अंमलीपदार्थीरोधी पथकाच्या पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली. दीपक कळंगुटकर हा गोव्यातील एक कुख्यात ड्रग पेडलर आहे आणि त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाशी संबंध आहेत, अशी माहिती कोची अबकारी खात्याचे सहाय्यक आयुक्त एम. के. नारायणन कुट्टी यांनी दिली. दीपक कळंगुटकर याला मोठे आमिष दाखवून पद्धतशीरपणे कोची येथे बोलावण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. मागील आठवड्यात अमलीपदार्थ विरोधी पथकाने सनीश सेरोथ्थामन (32) याला अटक केली होती. त्याच्याकडून 85 लाख रूपयांचे ड्रग्स जप्त केले होते. हे ड्रग्स प्रामख्याने संगीत रजनी किंवा रेव्ह पार्ट्यात वापरले जातात, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
 
 कोची-एर्नाकुलम पोलीस स्थानकावर दीपक कळंगुटकर याच्या विरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस या संपूर्ण टोळीचा छडा लावण्याच्या प्रयत्नांत आहेत. दीपक कळंगुटकर याला जामीन मिळवून देण्यासाठी बड्या वकिलांची एक टीम कोचीला दाखल झाल्याची खबर आहे. गोव्याहून खास दाखल झालेले एक वकिल यासाठी खास प्रयत्न करीत असल्याचेही पोलीस सुत्रांनी सांगितले.

गोवा पोलिसांना पत्ता नाही
गोवा पोलीस खात्यातील अमलीपदार्थ विरोधी पथकाशी संपर्क साधला असता दीपक कळंगुटकर नामक व्यक्ती राज्यात ड्र्ग्स व्यवसायात असल्याची कोणतीच नोंद किंवा खबर त्यांच्याकडे नाही, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...