आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata based Scientist Comes Up With Concept Of 'solar Shirt' To Cool Summer Heat

उन्हाच्या काहिलीतून सुटकेसाठी आला ‘सोलार शर्ट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- उन्हाळ्याची काहिली शमवण्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय शोधतो. मात्र, येथील एका शास्त्रज्ञाने सोलार समर शर्ट विकसित केला असून शर्टमधील सौर सेल्स व पंखा शर्ट घालणा-यांसाठी थंडावा निर्माण करेल, असा दावा करण्यात आला आहे.

शर्टाच्या धाग्यात किंवा त्याच्या खिशामध्ये छोटे सोलार सेल्स विकसित करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे फोटोव्होल्टिक सिस्टिम इंजिनिअरिंग व डिझाइनचे तज्ज्ञ सतीपदा गोनचौधरी यांनी सांगितले. सेलमार्फत 400 वॅट वीजनिर्मिती होऊ शकते. या सेलची साइज 2.5 ते 3 इंचाची असेल. सेलफोन, टॅब्लेट किंवा अन्य डिजिटल उपकरण चार्च करण्याएवढी वीज शर्टात असणार आहे. सोलार शर्टमागील संकल्पना विशद करताना गोनचौधरी म्हणाले,शर्टाला दोन पदर असतील. यामध्ये एका पदरात सौर ऊर्जेवर चालणारे दोन किंवा चार छोटे पंखे असतील. संगणकात वापरल्या जाणा-या पंख्यापेक्षा याचा आकार लहान असणार आहे.

एखाद्या व्यक्तीची उंची 5.5 फूट असेल तर त्याच्या शरीरावरील प्रत्येक चौरस फुटावर पडलेल्या सूर्यकिरणातून सोलार सेल्सच्या मदतीने 400 वॅट वीज तयार होऊ शकेल. ही वीज मोबाइल, टॅब्लेट, आयपॅड आदी उपकरणे चार्च करण्यासाठी पुरेशी आहे, असे गोनचौधरी म्हणाले. अ‍ॅशदेन पुरस्कार विजेते गोनचौधरी बंगाल अभियांत्रिकी व विज्ञान विद्यापीठात प्रोफेसर असून त्यांनी यासंदर्भातील संशोधन प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केला आहे.

शर्टची किंमत सोळाशे रुपये
उकाडा घालवण्यासाठी हा शर्ट सारखा घालण्याची आवश्यकता नाही. उन्हामध्ये ठरावीक कालावधीत शर्ट घातल्यास त्यातील सौर सेल चार्च होऊ शकतील. एखादा साधा शर्ट हजार रुपयाला येत असले तर सोलार शर्टची किंमत सोळाशे रुपये असेल, असे गोनचौधरी म्हणाले. सौर शर्ट शरीरासाठी अपायकारक ठरणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. जगभरात सुरू असलेल्या संशोधनातून सौर ऊर्जेवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.