आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅच घेताना सहकाऱ्याला धडकलेल्या कोलकात्याच्या केसरीचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - क्रिकेट सामन्यादरम्यान झेल घेण्यासाठी धावताना सहकारी खेळाडूला धडकलेल्या कोलकाताचा क्रिकेटर अंकित केसरीचे सोमवारी निधन झाले. शुक्रवारी कोलकातामधील यादवपूर ग्राउंडवर भवानीपूर क्लबविरुद्धच्या सामन्यात अंकित झेल घेण्यासाठी धावला आणि सहकारी खेळाडू सौरभ मंडलला धडकला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्याला हॉस्पिटलमध्येच ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.
28 ऑक्टोबर 1994 ला जन्मलेला अंकित केसरी बंगाल अंडर 19, इस्ट झोन अंडर 19, क्रिकेट असोसिएशन ऑफ बांगला इलेव्हन आणि बंगाल अंडर 23 टीम कडून क्रिकेट खेळत होता. 20 वर्षीय अंकित डावखूरा फलंदाज होता. आतापर्यंत फक्त 47 सामन्यांमध्ये तो खेळला होता.

अपोलोमधून का हलवले ?
मैदानात जखमी झाल्यानंतर अंकितला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनर त्याला नाइटिंगल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले गेले. असे का केले गेले, याचे कोणाकडेच उत्तर नाही. अपोलो हॉस्पिटलमध्ये अत्याधूनिक सुविधा असताना त्यापेक्षा कमी दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये त्याला का हलवले हे कोणीही सांगत नाही.

फोटो - चेन्नईच्या मरीन बीचवर फिटनेस सेशन दरम्यानचा फोटो अंकितने पोस्ट केला होता. लाल वर्तूळात अंकित केसरी.
पुढील स्लाईडवर बघा, अंकीत केसरीचे फोटो....