आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारापासून वाचण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरुन मारली उडी, बॉयफ्रेंडसह तीन जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एका तरुणीने बलात्कारापासून वाचण्यासाठी दोन मजली इमारतीवरुन उडी मारली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत बॉयफ्रेंडसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
हुबळीहून आली होती हावड्याला
- अशी माहिती आहे, की तरुणी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी रविवारी हुबळीहून हावडा येथे आली होती.
- तरुणी बॉयफ्रेंडला भेटायला आली तेव्हा तिथे आणखी दोन जण होते.
- त्या तरुणांनी तिला पिण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक दिले. त्यात गुंगीचे औषध मिसळले होते.
- त्यानंतर त्यांनी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड सुरु केली तर जीवे मारण्याची धमकी दिली.
- तरुणी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटली आणि धावत जाऊन बालकनीतून उडी मारली.
- तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला जखमी आवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता तिची प्रकृती स्थिर आहे.
- स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना पकडले असून अधिक तपास सुरु आहे.