आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीनंतरही कोलकात्याच्या वेश्यांनी 2 दिवसांत कमावले 50 लाख, वाचा कसे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता (पश्चिम बंगाल)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जवळपास सर्वच व्यवसायांना याचा फटका बसला. पण कोलकात्याच्या 'सोनगाची' या रेड लाईट एरियात या निर्णयाचा बंपर फायदा झाल्याचे दिसून आले. येथील वेश्यांनी केवळ दोन दिवसांत 50 लाख रुपयांची कमाई केली. एरवी या परिसरात दररोज 5 लाख रुपयांची उलाढाल होते. पण वेश्यांनी घेतलेल्या एका निर्णयाने त्यांची कमाई अनेक पटींनी वाढली.
त्याचे झाले असे की येथील वेश्यांनी 2001 मध्ये उषा मल्टिपरपज कोऑपरेटिव्ह बॅंक स्थापन केली आहे. या परिसरातील प्रत्येक वेश्येचे या बॅंकमध्ये अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्यापूर्वी या महिलांनी कमविलेले पैसे असेच खर्च व्हायचे. आयुष्याच्या शेवटी त्यांच्या हातात पैसे नसायचे. पण आता या बॅंकेमुळे वेश्यांचे सेव्हिंग वाढले आहे.
उत्पन्न वाढीबाबत डर्बन महिला समन्वयक समितीच्या प्रमुख भारती यांनी सांगितले, की आम्ही आमच्या सदस्यांना 500 आणि 1000 च्या जुना नोटा स्विकारण्यास सांगितले. सुमारे आठवडाभर आम्ही जुन्या नोटा स्विकारल्या. पण त्यानंतर घेतल्या जाणार नाही असे स्पष्ट ग्राहकांना सांगितले. त्याचा फायदा आमच्या उत्पन्न वाढीत झाला. एरवी येथील उलाढाल सुमारे 5 लाख रुपये प्रतिदिन राहायची. पण या निर्णयाने उत्पन्न कैक पटीने वाढले. आता जमा झालेल्या या जुन्या नोटा आम्ही बॅंकेच्या माध्यमातून बदलून देणार आहोत. आमचे काही नॅशनलाईज बॅंकेशी टायअपही आहे.
याबाबत माहिती देताना सेक्स वर्कर रेखा म्हणाली, की आम्ही जुन्या नोटा स्विकारल्या नसत्या तर कस्टमर गमावले असते. तसेच बॅंकेने जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन दिले असल्याने या नोटा वेस्ट जाणार नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, कोलकात्याच्या सोनगाची रेड लाईट एरियाचे काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...