आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशा: 112 वर्षांनंतर कोणार्क सूर्य मंदिराचा दरवाजा उघडण्‍याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणार्क (ओडिशा) - येथील प्रसिद्ध सूर्य मंदिरातील अत्‍यंत महत्‍त्‍वाचा भाग तब्‍बल 112 वर्षांपासून वाळू भरून बंद करण्‍यात आलेला आहे. मात्र, आता भाविक आणि पर्यटकांसाठी तो खुला करण्‍याच्‍या हालचाली गतीमान झाल्‍यात.
का बंद आहे मंदिर
- वाढत्‍या प्रदूषणामुळे या प्राचिन वास्‍तूला धोका निर्माण झाला होता. त्‍यामुळे आत असलेली कलाकुसर खराब होत होती.
- हा ठेवा भावी पिढीपर्यंत टिकावा, या उद्दात हेतूने वर्ष 1901 मध्‍ये तत्‍कालीन गव्‍हर्नर जॉन वुडबर्न यांनी जगमोहन मंडपाच्‍या भिंतीची उंची वाढवली आणि वाळू भरून मंदिर बंद केले. दरम्‍यान, डागडुजीही केली.
- सतत तीन वर्षे हे काम चालले. वर्ष 1903 मध्‍ये ते पूर्ण झाले.
- या काळात अनेक पुरातत्‍व अभ्‍यासकांनी ही वाळू काढून मंदिर उघड्याची मागणी केली.
- दरम्‍यान, सीबीआरआयच्‍या टीमने एंडोस्कोपी करून मंदिराच्‍या आतील फोटो आणि व्‍ह‍िडिओ चित्रिकरण केले.
- त्‍या आधारे अभ्‍यास सुरू आहे.
- या ठिकाणी जाणाऱ्या अनेक भाविकांना हेच माहिती नाही की, या मंदिराचा महत्‍त्‍वाचा भाग वाळू टाकून बंद करण्‍यात आला.
कशी काढणार वाळू ?
- पहिल्‍या टप्‍प्‍यात वाळू काढण्‍यासाठी एंडोस्कोपीच्‍या आधारे आतील भिंतीची मजबुती आणि बांधकामाचा अभ्‍यास केला जात आहे.
- दुसऱ्या टप्‍प्‍यांत वाळू काढणे आणि तिसऱ्या टप्‍प्‍यांत दरवाजाच्‍या जागी बांधलेली भिंत तोडण्‍याचे नियोजन आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणार्क सूर्य मंदिराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...