आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरी हल्ला कदापि विसरणार नाही, मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोझिकोडे - उरीमधील दहशतवादी हल्ला कधीही विसरू शकत नाही. १८ जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पाकिस्तानला दिला आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय मिळतो, हे आता उघड सत्य आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. दहशतवाद्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. भारत उरी हल्ला कधीही विसरू शकणार नाही. आमच्या १८ जवानांचे बलिदान कदापिही वाया जाणार नाही, हे मला पाकिस्तानच्या नेतृत्वाला स्पष्ट सांगायचे आहे, असे मोदी म्हणाले.
पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी उरीतील घटना घडवला आहे. आशियात दहशतवाद पसरवण्याची काम करणारा एकमेव देश आहे. त्यामुळे २१ वे शतक आशियाचे होणार नाही, यासाठी हा देश काम करत अाहे. प्रत्येक देशाला दहशतवादाची झळ बसत आहे. त्याला केवळ एक देश कारणीभूत आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश असो किंवा इतर कोणताही देश. हिंसाचारामागे पाकचे दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवादी अनेक देशांत जाऊन हिंसाचार, रक्तपात घडवू लागले आहेत. परंतु भारत दहशतवाद्यांपुढे कधीही गुडघे टेकवणार नाही. त्यांच्या उच्चाटनासाठी काम करत राहू, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने आयोजित सभेत मोदींनी शनिवारी मार्गदर्शन केले.
पुढे पाहा, बातमीशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...