आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसपी हत्या प्रकरणात राजाभय्याचे नाव वगळले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- कुंडाचे पोलिस उपअधीक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. माजी मंत्री राजाभय्याचा या आरोपपत्रात उल्लेखही करण्यात आला नाही. झिया यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत राजाभय्यावर आरोप ठेवले होते.

या गुन्ह्यातील सहभागाबद्दल राजाभय्याची चौकशी सुरू असून अद्याप तरी पुरावे हाती लागले नाहीत. त्याचा हात उघड झाल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. बालीपूरचे सरपंच नन्हे यादव यांच्या भावाने केलेल्या गोळीबारात झिया यांचा मृत्यू झाला. आरोपीने त्यासाठी झिया यांच्या पिस्तुलाचा वापर केला होता. सरपंचाच्या हत्येनंतर जमावाला शांत करण्यासाठी झिया घटनास्थळी गेले होते. त्या वेळी त्यांची हत्या करण्यात आली. त्याआधी राजाभय्याच्या पॉलिग्राफी चाचणीला परवानगी मागणारी याचिका विशेष सीबीआय न्यायाधीश मिर्झा झीनत यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आली. याचिकेवर 11 जून रोजी सुनावणी होणार आहे.