आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuldeep Bishnoi led Haryana Janhit Congress Snaps Ties With BJP

हरियाणात एनडीएत फूट पडली, हजकॉंचे अध्यक्ष बिष्णोईंची एनडीएला सोडचिठ्ठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | चंदीगड- ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणात एनडीएत फूट पडली. हरियाणातील हरियाणा जनहित काँग्रेसने (हजकाँ) भाजपशी तीन वर्षांपासूनची युती तोडून हरियाणा जनचेतना पार्टीसोबत (एचजेपी) मोट बांधली आहे.हजकाँचे अध्यक्ष कुलदीप बिष्णोई यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष माजी काँग्रेस नेते विनोद शर्मा यांच्या एचजेपीसोबत काम करेल, अशी घोषणा केली.

भिवानी जिल्ह्यातील सभेत बोलताना कुलदीप यांनी विश्वासघात हा भाजपाचा स्वभावच असल्याचा आरोप केला. मात्र हे आरोप फेटाळत भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन
यांनी पक्ष राज्यातील सर्व ९० जागांवर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
बिघाडाची कारणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच हजकाँ आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली होती. या निवडणुकीत भाजपने सातही जागांवर विजय मिळवला होता, तर हजकाँला दोनपैकी एकही जागा मिळवता आली नाही.

> विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरूनही हरियाणा जनहित काँग्रेस आणि भाजपमध्ये
वितुष्ट झाल्याचे उघड आहे.