आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Vishwas Apologize For Making Statement On Keral Nurses

केरळमधील परिचारिकांबाबत वादग्रस्त वक्तव्यावर कुमार विश्वास यांनी मागितलीमाफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोच्ची - केरळमधील परिचारिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी आता त्याबद्दल माफी मागितली आहे. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा आपला उद्देश नव्हता, असे विश्वास यांनी स्पष्ट केले आहे.
कुमार म्हणाले, या संदर्भात आपच्या केरळ शाखेकडे निवेदन पाठवले आहे. माझ्या एका कविसंमेलनाच्या व्हिडिओ क्लिपमुळे केरळमध्ये राहणा-या माझ्या अनेक मित्रांच्या भावना दुखावल्या आहेत. धर्म, जात, लिंग, समाजाच्या आधारे भेदभाव करण्यावर मी विश्वास ठेवत नाही. कविसंमेलनात काही कविता हलक्याफुलक्या पद्धतीने सादर केल्या जातात. त्याचा संबंध कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नसतो.
राजबब्बर आणि शत्रुघ्न माफी मागणार का?
कुमार विश्वास म्हणाले, मी माझ्या विधानावर माफी मागितली आहे. मात्र, राजबब्बर ‘इंसाफ का तराजू’तील अत्याचार आणि शत्रुघ्न सिन्हा ‘शैतान’मधील भूमिकेसाठी माफी मागणार का?
केरळमध्ये निदर्शने : विश्वास यांचे वक्तव्य प्रसिद्ध होताच केरळमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. 20 जानेवारी रोजी आपच्या स्थानिक कार्यालयामध्ये तोडफोड केली होती. मुख्यमंत्री ओमन चांडी यांनीही विश्वास यांना माफी मागण्यास सांगितले होते.
काय म्हणाले होते विश्वास?
विश्वास यांनी 2008 मध्ये आयोजित कविसंमेलनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंबंधीची व्हिडिओ क्लिप एका सोशल साइटवर अपलोड झाली आहे. त्यात विश्वास म्हणाले होते, ‘कालीपिली नर्सों को देखकर लगता है की यह सही में सिस्टर है। जबकी नॉर्थ इंडिया की नर्स शानदार है।’
‘कालीपिली नर्सों को देखकर लगता है की यह सही में सिस्टर है। जबकी नॉर्थ इंडिया की नर्स शानदार है।’