आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Vishwas Said Kiran Bedi Was BJP\'s Detective In Anna\'s Agitation

अण्णांच्या आंदोलनात किरण बेदींनी भाजपसाठी केली \'जासुसी\', विश्वास यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नागरिकांना अभिवादन करताना किरण बेदी. - Divya Marathi
फोटो - नागरिकांना अभिवादन करताना किरण बेदी.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत किरण बेदींना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर आपकडून होणार्‍या हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. आता तर आप नेते कुमार विश्वास यांनी अत्यंत खळबळजनक आरोप बेदींवर केला आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात किरण बेदी या भाजपसाठी हेरगिरी करत होत्या असे कुमार विश्वास म्हणाले आहेत.

बेदींवर हल्ल्याचे सत्र
कुमार विश्वास म्हणाले की, इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी) च्या टीममध्ये सर्वांना किरण बेदींवर संशय होता. तो संशय आता खरा ठरा आहे. बेंदी मुंख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनल्याने आपलाच फायदा होणार आहे. कारण भाजपकडे केजरीवालांच्या तोडीचा उमेदवार नसल्याचे त्यावरून स्पष्ट होते. तर मनीष शिसोदिया यांनी किरण बेदी भाजपसाठी आंदोलनात उतरल्या होत्या असा आरोप केला आहे. एकेकाळी ज्या काळ्या पैशाच्या मुद्यावरून बेदी भाजपवर टीका करायच्या तोच काळा पैसा त्यांना आता आपलासा वाटत असल्याचेही ते म्हणाले. तर किरण बेदींनी भाजप विरोधात जी वक्तव्ये केली होती, त्यावर आता त्या काय उत्तर देतील, अशा शब्दांत विचारणा केली.

भाजपचा पलटवार, विश्वास यांना आता का सुचले...
भाजपने या टीकेवर पलटवार केला आहे, दिल्लीचे प्रभारी प्रभात झा म्हणाले की, कुमार विश्वास यांना हे सर्व माहिती होते तर मग त्यांनी ते आधी का सांगितले नाही. आता ते त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवालही त्यांनी केला. आप किरण बेदींवर बळजबरी आरोप लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.

किरण बेदींच्या प्रचाराला वेग
दरम्यान, आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना किरण बेदी मात्र प्रचारामध्ये व्यस्त आहेत. शुक्रवारी बेदी यांनी त्यांचा मतदारसंघात रिक्षामध्ये प्रचार केला. बेदी म्हणाल्या की, लवकरच लोकपालची नियुक्ती केली जाणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.
अखेरच्या स्लाइड्वर पाहा, किरण बेदींच्या प्रचाराचे PHOTO