आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Vishwas Will File FIR Against Priyanka And Vadra

प्रियंका-राहुल विरोधात \'एफआयआर\'साठी पोलिस स्टेशनबाहेर कुमार विश्वास यांचे धरणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - आम आदमी पार्टी (आप)चे नेते आणि अमेठी लोकसभेतील उमेदवार कुमार विश्वास यांनी आज (शुक्रवार) गौरीगंज पोलिस स्टेशनमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधींविरोधात लिखित तक्रार दिली आहे. विश्वास यांचा आरोप आहे, की काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे विद्यमान खासदार व उमेदवार राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका यांच्या एका निकटवर्तीय व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
विश्वास यांच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करुन प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात येईल असे त्यांना सांगितले आहे. यावर विश्वास यांचे समाधान झाले नसल्याने समर्थकांसह ते पोलिस स्टेशनबाहेर धरणे देत आहेत. दुसरीकडे आज (शुक्रवार) आपचे नेते अरविंद केजरीवाल अमेठीचा दौरा करणार आहेत.
कुमार विश्वास यांनी तक्रारीत म्हटल्या प्रमाणे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी यु-ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्रियंका गांधी यांच्या कारमागे पळताना दिसत आहे. तो म्हणत आहे, कुमार विश्वासला गोळ्या घालून मारुन टाकतो. मात्र, प्रियंका गांधी त्याला समजावतात असे करणे योग्य नाही. कुमार विश्वास यांनी याआधीही काँग्रेस नेत्यांवर जीवे मारण्याचा आरोप केला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, कुमार विश्वास यांनी दिलेला व्हिडिओ