आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Vishwas`Family Asked To Leave Amethi, News In Marathi

कुमार विश्वास यांच्या कुटूंबियांनी अमेठी सोडण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांच्या कुटूं‍बियांना अमेठी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा हवाला देत कुमार विश्वास यांची पत्नी, मुले आणि अन्य सदस्यांना 11 वाजेपर्यंत अमेठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. कुमार विश्वास यांच्या कुटूंबातील एकही सदस्य नोंदणीकृत मतदार नसल्याचे कारण जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. अमेठी जिल्हा प्रशासन कुमार विश्वास यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेठी पोलिस सोमवारी रात्री कुमार यांच्या घरी धडकले. पोलिसांनी विश्वास यांच्या पत्नीला अटक करण्याची धमकी दिली. त्या नोंदणीकृत मतदार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना मंगळवारी 11 वाजेपर्यंत अमेठी सोडण्याचे फर्मान पोलिसांनी काढले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे माझी पत्नी आणि बहिणीला 11 वाजेपर्यंत अमेठी सोडण्यास सांगण्‍यात आले आहे. प्रियंका गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांना असे सांगण्याची हिम्मत नसल्याने त्यांनी प्रशासनाला हाताशी घेऊन हे कारस्थान केले असल्याचे ट्‍वीट कुमार विश्वास यांनी केले आहे.


आता हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक आयोगाकडे गेले आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, जे लोक नोंदणीकृत मतदार नाहीत त्यांना लोकसभा मतदारसंघ सोडण्यास सांगितले जाते. स्वतंत्र तसेच निष्पक्ष निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत.
कुमार विश्वास यांनी अमेठीतून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. भाजपतर्फे स्मृती इराणी रिंगणात उतरल्या आहेत. यंदा राहुल गांधी, कुमार विश्वास आणि स्मृती इराणी यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अमेठीत बुधवार (7 मे) मतदान होणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, व्हिडिओ...