आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किल्ल्यात झाला होता महाराणा प्रतापांचा जन्म, ही आहे देशातील सर्वात लांब भिंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर (राजस्थान) - कुंभलगड फेस्टीव्हल यंदा 4 ते 6 मार्च दरम्यान किल्ल्यावर आयोजित केला जाणार आहे. फेस्टिव्हलमध्ये लोक कलावंत आपली कला सादर करतील, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे. गुरुवारी सकाळी येथे वॉक अॅट कुंभलगड होणार असून त्यात 250 अॅथलिट धावणार आहेत.
काय आहे या किल्ल्याचे महत्त्व
- कुंभलगडच्या प्रमोशन आणि पर्यटन वाढीसाठी दरवर्षी येथे राज्य सरकारच्यावतीने महोत्सवाचे आयोजन केले जाते.
- भारतामध्ये या किल्ल्याच्या भिंतीची तुलना चीनच्या भिंतीशी केली जाते. या भिंतीची रचना देखिल त्याच पद्धतीची आहे.
- चीनच्या भिंतीवर एकाचवेळी पाच घोडे धावू शकतात, तर या भिंतीवर एकाचवेळी 10 घोडे धावतील एवढी तिची रुंदी आहे.
- 1443 मध्ये राणा कुंभाने हा किल्ला बांधला होता.

36 किलोमीटर लांब आहे किल्ल्याची भिंत
- देशात असलेल्या किल्ल्यांच्या तटबंदीत एवढी मोठी भिंत असलेला हा एकमेव किल्ला मानला जातो.
- या भिंतीची लांबी तब्बल 36 किलोमीटर आहे. किल्ल्याच्या रक्षणासाठी ती बांधण्यात आली होती.
- 'बादल महल' नावाने देखिल हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्याची शैलीच त्याचे वैशिष्ट्य आहे.
- त्या काळात या किल्ल्यातील वातावरण थंड राहिल याची उपाय योजना करण्यात आलेली होती.

महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्यात
- 15 व्या शतकात महाराणा प्रतापांचा जन्म याच किल्ल्यात झाला होता.
- कुंभलगड एका अर्थाने मेवाडची संकटकालिन राजधानी राहिलेला आहे.
- महाराणा कुंभापासून महाराणा राजसिंह यांच्यापर्यंत जेव्हा-जेव्हा मेवाडवर आक्रमण झाले होते, तेव्हा राजपरिवार याच किल्ल्यावर राहात होता.

'प्रेम रतन धन पायो'ची शूटिंग झाली
- सूरज बडजात्या दिग्‍दशर्शित राजश्री प्रोडक्शनच्‍या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटातील काही दृश्‍यांचे चित्रकरण या किल्‍ल्‍यात झाले.
- तीन दिवस येथे शूटिंग चालली. चित्रपटातील एका गाण्‍यात या किल्‍ल्‍यातील तोफखाना चौक, यज्ञ वेदीच्‍या जवळ असलेली भिंत आणि भैरव पोल दाखवण्‍यात आले.
- शुटिंग दरम्यान किल्ल्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावपळ पाहायला मिळत होती.

यंदा फेस्टिव्हलमध्ये काय विशेष
- जिल्हाधिकारी अर्चनासिंह म्हणाल्या, कुंभलगड फेस्टिव्हलमध्ये यंदा पेटिंग, फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुमिता सरोच म्हणाल्या, फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता महेशाश्रम मेघवाल आणि ग्रुपचे मीरा भजन, 8 वाजता एक तास योग, सकाळी 11 वाजता खैराजी राम ग्रुपचा कठपुतळीचा कार्यक्रम, आणि दिवसभर राजस्थानातील विविध लोक कलावंतांचे कार्यक्रम होतील.
- सायंकाळी 6.30 वाजता म्युझिकल कल्चरल इव्हिनिंग असेल. त्यात राहुल शर्मा संतुर वादन करतील.

पुढील स्लाइडमध्ये फोटोज मधून पाहा, किल्ल्याचे अनोखे सौंदर्य
>> भिंतीच्या पूर्णत्वासाठी संताचा बळी
>> किल्यावर अनेक मंदिरे
>> आता कोणाच्या ताब्यात आहे किल्ला