आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्याप्रमाणावरील विरोध बाजूला सारत कुडानकुलम अणुप्रकल्प कार्यान्वित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तामिळनाडूतील कुडानकुलम अणुप्रकल्प शनिवारी रात्री कार्यान्वित झाला. अणुप्रक्रिया यशस्वी झाल्याचे अणुप्रकल्पाचे संचालक आर.एस. सुंदर यांनी सांगितले. यामुळे 20 दिवसांत 400 मेगावॅट व 40 दिवसांत 1000 मेगावॅट वीज पुरवठा सुरू होईल. रशियाच्या सहकार्याने अणुऊर्जा प्रकल्प तयार करण्यात आला. प्रकल्पावर साधारण 17 हजार कोटी रुपये खर्च झाले असून देशातील ते 21 वे अणुऊर्जा केंद्र आहे.


कुडनकुलममध्ये आण्विक प्रक्रिया
अणुभट्टीच्या गाभ्यात न्यूट्रॉनची वेगवान प्रक्रिया शनिवारी दुपारी सुरू झाली. प्रायमरी कुलंट वॉटरमध्ये बोरिक अ‍ॅसिडच्या मिश्रणाने अपेक्षेनुसार काम केले. यामध्ये पहिल्यांदा हलक्या पाण्याच्या श्रेणीतील प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टरचा वापर करण्यात आला आहे.


तामिळनाडूमध्ये 436 मेगावॅट वीज
तामिळनाडू जनरेशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पातील 1000 मेगावॅट वीज निर्मितीपैकी 436 मेगावॅट वीज राज्याला मिळेल, उर्वरित वीज इतर राज्यांना दिली जाईल.


ऑक्टोबरमध्ये इंधन भरले होते
पहिल्या अणुभट्टीमध्ये ऑक्टोबर 2012 मध्ये सुमारे 80 टन अणु इंधन युरेनियम ऑक्साइड भरण्यात आले होते.


आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षेचे निकष
अणु भट्टीमध्ये काम सुरू करण्यापूर्वी याच्या सुरक्षा निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली. हे निकष आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. येथे सक्रिय व पॅसिव्ह सुरक्षा व्यवस्था लागू असून संयंत्र, लोक व पर्यावरणाची सुरक्षा होईल.
स्फोटानंतर पसरणा-या शॉक वेव्हचा परिणाम नाही.
8.0 तीव्रतेचा भूकंपही या हादरा देऊ शकत नाही.
20 टन लढाऊ विमान पडले तरी परिणाम होणार नाही.


सुनामीच्या लाटाही कमी पडतील
> सयंत्र समुद्र सपाटीपासून 8.7 मीटर वर आणि सुमारे 250 मीटर दूर आहे.
> 5.50 मीटर उंच सुनामी लाटाही अणु भट्टीपर्यंत पोहचू शकणार नाहीत. 2004 मध्ये आलेल्या सुनामीची सर्वात उंच लाट 2.50 मीटर होती.


विरोधात आज निदर्शने
कुडानकुलम प्रकल्पाला स्थानिक लोक पीपल्स मूव्हमेंट अगेन्स्ट न्यूक्लिअर एनर्जी संस्थेच्या नेतृत्वाखाली सोमवारी काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.


प्रकल्पाचा इतिहास
1988 भारत व सोव्हिएत संघामध्ये अणु भट्टी तयार करण्याचा करार.
1990 पेचीपराइ बंधा-यातून पाणी वळवण्यास पहिल्यांदा विरोध.
1998 सोव्हिएत संघाची माघार, नवीन समझोता केला.
2011 ड्राय रन सुरू झाले. पीएमके, व्हीसीके, जयललिता व मेधा पाटकर विरोधात आले.