सुरजकुंड - लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याची सुस्पष्ट कबुली पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिली. येथे आयोजित पक्षाच्या नुतन खासदारांच्या प्रशिक्षण वर्गात सदस्यांना मार्गदर्शन करताना रविवारी अडवाणी यांनी आपण मोदींसारखा खेळाडू पाहिला नाही. त्यांनी पहिल्याच सामन्यात त्रिशतक काढली, असे गौरवोद्गार काढले. सुरजकुंड येथे आयोजित पक्षाच्या नुतन खासदारांच्या दोन दिवशीय मार्गदर्शन शिबिराच्या समारोपप्रसंगी अडवाणी बोलत होते. त्यांच्या भाषणाचा रोख लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडला मिळालेल्या 300 पेक्षा जास्त जागांकडे होता. निवडणुकीच्या निकालाच्यावेळी व त्यानंतर बरेच दिवस अडवाणी विजयाचे र्शेय मोदींना देण्याचे टाळत होते. परंतु आता पक्षाच्या खासदारांसमोर बोलताना मोदींनीच पक्षाला मोठा विजय मिळवून दिल्याची कबुली त्यांनी दिली.
अडवाणी म्हणाले,‘कसोटीत पदार्पणातच खेळाडूने शतक किंवा द्विशतक लगावल्याचे आपण ऐकले आहे. परंतु पहिल्याच कसोटीत एखादा खेळाडू कप्तान झालेला आणि त्रिशतकही लगावणारा खेळाडू माझ्या तरी बघण्यात नाही. परंतु ही कामगिरी केवळ नेत्याची (मोदी) नव्हे तर त्यांच्या टीमचीदेखील आहे.’
शिबिरात रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सुरेश
सोनी यांनी खासदारांना केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व पियूष गोयल म्हणाले. सोशल मीडिया व मीडियाची पोहोच आणि प्रभाव व्यापक झाला आहे. भाजप खासदारांनी पक्षाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग करावा.
(फोटो - सूरजकुंड येथे आयोजित पक्षाच्या नुतन खासदारांच्या प्रशिक्षण वर्गात सदस्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी.)