आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Labourer Sets Herself Ablaze After Being Raped By Cop News In Marathi

पोलिस सब इन्स्पेक्टरचा मजूर महिलेवर बलात्कार, पीडितेने घेतले पेटवून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील लदाखमध्ये कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला मजुरावर पोलिस सब इन्स्पेक्टरने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नंतर पीडित महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपी पोलिस अधिकार्‍याला अटक केले आहे. घटना कारगिल जिल्ह्यातील चुलीचान-बाटलिक भागात गेल्या रविवारी घडली. मोहम्मद रमजान असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने घरी गेल्यानंतर 'आपबिती' पतीला सांगितली. परंतु, त्याने याप्रकरणी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पीडितेला संताप आला आणि तिने स्वत:ला पेटवून घेतले. पी‍डितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे. पोलिस सब-इन्स्पेक्टर मोहम्मद रमजान याने बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. पोलिस प्रशासनाने आरोपी रमजान याला तडकाफडकी निलंबित केले आहे. याप्रकरणी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, तीन महिन्यांत दुसरी घटना...
लदाखमध्ये तीन महिन्यांत बलात्काराची दुसरी घटना घडली आहे. फेब्रुवारीमध्ये एक इमामने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. नंतर मुलीचा मृतदेह सिंध नदीत फेकून दिला होता. बिहारमधील रहिवासी इमामला पोलिसांनी अटक केली.