आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखला जोडणारा महामार्ग मोकळा, बर्फ हटवण्यास लागले दोन महिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीर आणि लडाखला जोडणारा श्रीनगर-लेह महामार्ग बुधवारी सुरू झाला. सरहद्द रस्ते संस्थेचे (बीआरआे) जवान १८ मार्चपासून बर्फ हटवण्याचे काम येथे करत होते. गेल्या वर्षी देखील १३ मे रोजी मार्ग खुला झाला होता.

लष्कराची सर्व रसद याच मार्गावरून जाते
विशेष म्हणजे हा मार्ग केवळ पाच ते सहा महिनेच सुरू असतो. या काळात लष्करी वाहने, साहित्य यांच्या ताफ्यांना याच मार्गावरून जावे लागते. कारगिल, द्रास, लेहसारख्या प्रदेशात लष्करी तुकड्या याच मार्गावरून जातात. यंदा १२ जानेवारी रोजी हा मार्ग बंद झाला होता. जोजिला खोरे ११,५७८ फूट उंचीवर आहे. यावर्षी परिसरात १८ ते ५० फूट जाडीचा बर्फ साठला होता.

५० वर्षांपासून बीआरआेकडे रस्ते सफाई
हा महामार्ग ४३४ किलो मीटर लांबीचा आहे. जोजिला खोरे ९ किमी लांबीचे आहे. बर्फवृष्टीमुळे दरवर्षी हा मार्ग बंद होता. टेलिग्राफ ट्रॅव्हल मासिकाच्या वतीने जगातील सर्वात धोकादायक मार्गांमध्ये या रस्त्याचा समावेश केला होता.