आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४६ पैकी ४३ महिलांनी कधी सायकल चालवली नाही, आता स्टंटसाठी बुलेटचे घेताहेत प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- या वर्षी मार्च महिन्यात सीमा सुरक्षा दलास(बीएसएफ) बाइकवर स्टंट करणाऱ्या महिलांची पहिली टीम मिळेल. त्यास महिला जांबाज नाव देण्यात आले आहे. टीममध्ये पुरुष जांबाज टीमचे तज्ज्ञ उपनिरीक्षक के.एम. कल्याण प्रशिक्षण देत आहेत.  

कल्याण म्हणाले की, देशभरातील ५ हजार महिला सैनिकांमधून ४६ जणींची निवड केली. ग्वाल्हेरची बीएसएफ अकादमी टेकनपूरमध्ये गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरपासून त्यांना प्रशिक्षण देत आहे. टीम मार्चमध्ये पहिला परफॉर्मन्स देईल. त्यांना रोज ६ तास प्रशिक्षण दिले जाते. १३ िवविध प्रकारची कौशल्ये त्या शिकल्या आहेत. सीआरपीएफने याआधी महिलांची अशी टीम बनवली आहे. मात्र, ही टीम ८ प्रकारांपुढे सरकली नाही. टीमच्या सदस्य पंजाबच्या मंमदौन सेक्टरच्या सिमरपाल कौर म्हणाल्या, लहानपणी भावाकडे दुचाकी शिकवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा हे मुलांचे काम आहे, म्हणून नकार दिला. इथे आल्यानंतर भावाला सांगितले की, मी बुलेटवर धोकादायक स्टंट करतेय. हे ऐकून तो हैराण झाला. आता मात्र तो आनंदी आहे. 

लडाखची उपनिरीक्षक स्टेजिंग नॉरयांग टीमची कर्णधार आहे. ती म्हणाली, आमच्यासोबत प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ पैकी ४३ जणींनी कधी सायकलही चालवली नव्हती. मात्र, टीममध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जणी बुलेट चालवायला शिकल्या.

१३ सादरीकरणांचे २२ पर्यंत गाठण्याचे लक्ष्य  
टीमने सर्व २२ प्रकारांत कौशल्य मिळवल्यास २०१८ मध्ये राजपथावर टीम आपले प्रदर्शन दाखवू शकेल. असे झाल्यास राजपथावर बाइकवर स्टंट करणाऱ्या महिलांची देशातील पहिली टीम ठरेल.  
- मुकेश त्यागी, कमांडंट, बीएसएफ अकादमी टेकनपूर, ग्वाल्हेर
 
बातम्या आणखी आहेत...