आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाकी वर्दीची \'दबंग\'गिरी: पोलिसांनी महिलेला भरस्त्यावर बनवले \'मुर्गा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेला पोलिसांनी अशा प्रकारे भररस्त्यावर मुर्गा बनवले - Divya Marathi
पीडितेला पोलिसांनी अशा प्रकारे भररस्त्यावर मुर्गा बनवले
मेरठ- उत्तर प्रदेशात खाकी वर्दीची 'दबंग'गिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मेरठमध्ये एका शुल्लक कारणावरून झालेल्या वादावरून पोलिसांनी एका महिलेसोबत अमानवी व्यवहार केला आहे. महिलेला भरस्त्यावर बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिला 'मुर्गा' बनवले आणि ओढतच ठाण्यात नेले. मेरठमध्ये शुक्रवारी (5 जून) ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला भारतीय स्टेट बॅंकेच्या स्थानिक शाखेत रुपये भरण्यासाठी आली होती. यादरम्यान कॅशियरसोबत शुल्लक कारणावरून तिचा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कॅशियरने पोलिसांना बोलावले. महिला कॉंस्टेबलने पीडितेचे म्हणणे ऐकून न घेता तिला बॅंके बाहेर ओढले. बेदम मारहाण केली. सगळ्यासमोर तिला उन्हात मुर्गा बनवत पोलिस ठाण्यात नेले. परंतु, मीडियाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलिसांनी पीडितेला घरी सोडले आहे. ममता असे पीडितेचे नाव आहे. पीडितेला मारहाण केली नसून ती मानोरुग्न असल्याचे एसपीने म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेचे फोटोज...