आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाखांच्या बाथटबमध्ये अंघोळ करत होती लेडी डॉन, बाथरुममध्येही लावले AC

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समताने  प्रत्येक रुममध्ये 5 ते 7 लाखांपर्यंतची सजावट करण्यात आली आहे. - Divya Marathi
समताने प्रत्येक रुममध्ये 5 ते 7 लाखांपर्यंतची सजावट करण्यात आली आहे.
जोधपूर - लेडी डॉन समता बिश्नोईच्या पार्श्वनाथ कॉलनीमधील तीनमजली बंगल्यातील लक्झरी पाहून कोणाचेही डोळे दिपून जातील. चौथी पास समता या बंगल्यात दोन मुले आणि सासऱ्यासोबत राहाते. समता आणि तिची मुले एकाच मजल्यावर राहातात मात्र बंगल्यातील दोन डझन रुमच्या साजवटींवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे. समताच्या बेडरुममधील बाथरुममध्ये पाच लाखांचा बाथटब बसविण्यात आलेला आहे. त्यासोबतच प्रत्येक बाथरुममध्ये एसी आहे.
घरात मॉलसारखे सामान भरून ठेवलेले
- पोलिसांनी सलग दोन दिवस या घराची झडती घेऊन अंदाज लावला आहे, की प्रत्येक रुममध्ये 5 ते 7 लाखांपर्यंतची सजावट करण्यात आली आहे.
- समता आणि तिची मुले व सासरा एका मजल्यावर राहात होते. इतर दोन मजल्यांवर कोणीही राहात नसताना तिथे प्रत्येक रुममध्ये फ्रिज, वॉशिंग मशिन, एलइडी आणि गरजेपेक्षा जास्त भरून ठेवलेले किराना सामान होते.
- घरात चार फुटांची तिजोरी सापडली, त्यातील 20 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
- एका मजल्यावर किराणा सामान एखाद्या मॉलमध्ये भरुन ठेवावे तसे ठेवलेले आहे.
- घरात एवढे सामान आहे की वर्ष-दोनवर्षे बाजारात जाण्याची गरज पडणार नाही.
कसा कमावला एवढा पैसा
- समताने डोडा पोस्ट येथे केलेल्या अंमली पदार्थ, दारु आणि लक्झरी कार तस्करीतून हा पैसा कमावला आहे.
- येथली तस्करीतून पाच कोटींचा नफा झाला त्यातूनच तिने बंगला बांधला होता.
- सरकारने डोडा पोस्टवर बंदी घातल्यानंतर समताला येथील तस्करीतून दर महिना 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळत होता.
80 लाखांच्या 6 लक्झरी कार जप्त
- पोलिसांनी डोडा पोस्ट येथून तस्करीमार्गे आणलेल्या फॉर्च्यूनर, इनोव्हा स्कॉर्पिओ, स्विफ्ट डिझायर अशा 80 लाख रुपये किंमतीच्या कार समताच्या बंगल्यातून जप्त केल्या.
- त्यासोबतच बंगल्यातून पैसे मोजण्याचे मशिनही जप्त करण्यात आले आहे.
पैशांची बचत व्हावी म्हणून घरात कासव
- समताच्या तस्करीचा नफा दुप्पट व्हावा यासाठी ती नेहमी होम-हवन करीत होती.
- समताच्या दहाही बोटांमध्ये हिरे - सोन्याच्या अंगठ्या राहात होत्या.
- धंद्यात तोटा झाला तरी तो कासवाच्या गतीने व्हावा यासाठी तिने घरात कासव पाळले होते.
- बंगल्याच्या परिसरात फिरणार्या या कासवाला आता शेजारी खाऊ घालत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लेडी डॉनची लक्झरी लाइफ
बातम्या आणखी आहेत...