आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS असल्याचे सांगणाऱ्या LADY DON \'कोको\' ला पोलिसांनी केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक करण्यात आलेली लेडी डॉन खुशबू शर्मा. - Divya Marathi
अटक करण्यात आलेली लेडी डॉन खुशबू शर्मा.
उदयपूर - हॉटेल, हँडीक्राफ्ट आणि टॅक्सीवाल्याचे पैसे न देता पळालेली बनावट IAS खुशबू शर्मा उर्फ लेडी डॉन कोको हिला पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. सोमवारी पोलिस तिला कोर्टासमोर हजर करणार आहेत.

जयपूरमध्येही खुशबूने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी खुशबू शर्मा अलकापुरी येथील रामप्रताप हॉटेलमध्ये राहिली होती. हॉटेलमध्ये जेवण, हँडीक्राफ्टच्या सामानाची खरेदी केली. तसेच हॉटेलची टॅक्सी घेऊन फिरायला गेली होती. पण टॅक्सीवाल्यासा फसवून ती पळून गेली होती.

स्वतःच स्वतःचे नाव कोको ठेवले
लोकांना विम्याचे पैसे देण्याच्या नावावर दिल्लीच्या एका टोळीबरोबर मिळून तिने फसवणुकीचे अनेक प्रकार केल्याचेही समोर आले आहे. तिने द. अाफ्रिकेची लेडी डॉन कोकोच्या नावावरून स्वतःचे नाव ठेवले आहे.

आतापर्यंतची प्रकरणे
IAS असल्याचे सांगणारी मोस्ट वाँटेड लेडी डॉन खुशबू शर्माला 27 मेला अटक झाली होती. त्यानंतर अनेक पीडित पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी तिच्याबद्दल अनेक तक्रारी केल्या. एका पीडिताने दिलेल्या माहितीनुसार लेडी डाॅनने त्याला अजमेर रोडवर त्याच्या कारमध्ये लिफ्ट घेतली होती. त्यानंतर त्याला गप्पांमध्ये अडकवून राजापार्कला घेऊन गेली होती. त्याठिकाणी काही वेळ कारमध्ये फिरल्यानंतर लेडी डॉनने मेडिकलमधून काही सामान मागवले. पण तो सामान घेऊन येईपर्यंत ती कार घेऊन फरार झाली होती. पोलिसांनी बुधवारी या लेडी डॉनला अटक केली.

पोलिसांनी ज्या कारमध्ये खुशबूला पकडले होते त्यावर अजमेरच्या प्रसिद्ध कॉलेजचे स्टीकर लागलेले होते. त्याचप्रमाणे काही जणांनी खुशबूवर ब्लॅकमेल केल्याचाही आरोप केला आहे. हाय प्रोफाईल लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळणे तसेच टेस्ट ड्रायव्हींगच्या बहाण्याने कार पळवणे असे कारनामे ही लेडी डॉन करायची.

पाच जिल्ह्यांत वाँटेड, पाच नावे
पांच जिल्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या कोको लेडी डॉनची अनेक नावे आहेत. क्राइम फाइलमध्ये तिचे नाव खुशबू शर्मा (26) उर्फ पुजा उर्फ प्रियासिंह उर्फ काजल उर्फ स्मृती अशा विविध नावांनी तिला ओळखले जाते.

हाँगकाँगमध्ये शिकल्याचा दावा
15 सप्टेंबर 2013 मध्ये खुशबूने तिचे शिक्षण हाँगकाँग विद्यापीठातून झाले असून तिने सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागातून शिक्षण घेतल्याचा दावा तिने केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लेडी डॉनचे PHOTO (फोटो फेसबूक पेजवरून)
बातम्या आणखी आहेत...