आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेग्‍नेंट लेडी जजच्‍या शरीरावर होत्‍या 33 जखमा; यामुळे संपवले प्रेमाला, पतीने केला धक्‍कादायक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्‍तर प्रदेशातील कानपूर जिल्‍ह्यात 9 ऑक्‍टोबर, 2016 रोजी न्‍यायाधीश प्रतिभा गौतम यांचा मृतदेह त्‍यांच्‍या घरातून पोलिसांनी ताब्‍यात घेतला होता. त्‍यांचे पती मनु अभिषेक रंजनने पोलिसांना प्रतिभा यांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे सांगितले होते. मात्र क्राइम सीन पाहून पोलिसांना संशय आला. पोस्‍ट मार्टम रिपोर्टमुळे या प्रकरणाचे वेगळेच सत्‍य समोर आले. त्‍यानंतर युपी पोलिसांनी अवघ्‍या 24 तासांत या खुनाच्‍या गुन्‍ह्याचा छडा लावला. "सुपरकॉप सीरीज" अंतर्गत आम्‍ही या  प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-याशी चर्चा केली. कशा पद्धतीने  या प्रकरणाचा छडा लावण्‍यात त्‍यांना यश आले, हे त्‍यांनी सविस्‍तरपणे सांगितले.


प्रेग्‍नेंट होती प्रतिभा, शरीरावर होते अत्‍याचाराचे 33 निशाण
- या गुन्‍ह्याचा छडा लावणा-या एसएसपी शलभ माथूर यांनी सांगितले, 'आम्‍हाला 9 ऑक्‍टोबर, 2016 रोजी सकाळी 9 वाजता मा‍हिती मिळाली की, न्‍यायाधीश प्रतिभा यांनी त्यांच्‍या शासकीय निवासस्‍थान येथे आत्‍महत्‍या केली. आम्‍ही त्‍यांचे पती मनु अभिषेक रंजन यांची विचारपूस केली. आमच्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे देताना ते घाबरलेले दिसले. ते त्‍यांचे विधानही बदलत होते. तेव्‍हाच मला शंका आली की, या मृत्‍यूसोबत यांचे नक्‍कीच काहीतरी कनेक्‍शन आहे.'
- पोस्‍टमार्टम रिपोर्टमध्‍ये प्रतिभा या 3 महिन्‍यांनी प्रेग्‍नेंट असल्‍याचे समोर आले. तसेच मृत्‍यूपूर्वी त्‍यांना टॉर्चर केले गेले होते. त्‍यांच्‍या शरीरावर रॉडने मारहाण केल्‍याच्‍या आणि ब्‍लेड कटच्‍या 33 निशाण होत्‍या.

 


पहिला पुरावा
मनु यांचे स्‍टेटमेंट- मी आलो तेव्‍हा बॉडी लटकलेली होती. जसे मी तिला स्‍पर्श केला, ती खाली पडली.
सत्‍य- मृत प्रतिभा यांच्‍या गळ्यावर 'ओ' आकाराचे निशाण होते. मात्र गळफास घेऊन आत्‍महत्‍या करणा-या व्‍यक्‍तीच्‍या गळ्यावर नेहमी 'व्‍ही' आकाराचे निशाण बनते.


दुसरा पुरावा
- खोलीतील पंख्‍यावर रक्‍ताचे डाग आढळले, मात्र त्‍याचे पाते अगदी व्‍यवस्थित होते. ज्‍या पंख्‍यावर लटकून गळफास घेतलेला असतो त्‍याचे पाते वाकलेले असतात. मात्र शुलभ यांनी सांगितले की, पंखा अगदी व्‍यवस्थित होता. एकंदरीत पाहता हत्‍येनंतर बॉडीला  पंख्‍याला लटकवण्‍याचे प्रयत्‍न करण्‍यात आले होते.


तिसरा पुरावा
- पोस्‍ट मार्टम रिपोर्टमध्‍ये हत्‍येपूर्वी प्रतिभा यांना टॉर्चर करण्‍यात आल्‍याचे सत्‍य समोर आले. त्‍यांच्‍या शरीरावर रॉडने मारहाण केल्‍याचे 16 निशाण मिळाले. त्‍यांच्‍या एका मनगटावर 6 ब्‍लेड कट आणि दुसरीकडे 8 ठिकाणी ब्‍लेड कटचे निशाण आढळले. त्‍यांच्‍या मानेवरीही ब्‍लेडने कापल्‍याचे 3 निशाण मिळाले. त्‍यांच्‍या शरीरावर एकूण 33 निशाण असल्‍याचे पोस्‍ट मार्टम रिपोर्ट मध्‍ये दिसून आले.

 

करंट स्‍टेट्स
- या तीन पुराव्‍यांच्‍या आधारावर एसएसपी शलभ माथूर यांनी मनु अभिषेक रंजन हा दोषी असल्‍याचे सांगितले. सध्‍या प्रतिभा यांचा पती हत्‍येच्‍या आरोपाखाली तुरुंगात आहे.


पुढील स्‍लाइडवर वाचा खुनी पतीने  पोलिसांना सांगितलेली धक्‍कादायक कहाणी, का आणि कशा पद्धतीने संपवले प्रेमाला?   

 

बातम्या आणखी आहेत...