आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 हजार फूट उंचीवर पहिल्यांदाच झुंजार महिलांची तुकडी; पहिलाच प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंजी, उत्तराखंडहून लाइव्ह- मानवी धैर्याला आव्हान देणारी पर्वतराजी आणि त्यांना कापत पुढे सरसावणाऱ्या नद्या. कुठे निस्तेज, अचल जलसंचय, तर कुठे आपला जीव वाचवण्याच्या ओढीने सुसाट पळणारे पाणी. अंदाज येऊ शकणाऱ्या या हिमनद्या. या नद्यांप्रमाणेच हिम विरांगणांना भेटण्यासाठी आम्ही पर्वताएवढे आव्हान ओलांडले.

दिल्लीहून मालगुडीसारखे रेल्वेस्थानक काठमोदामला जाण्यासाठी रेल्वेत पाय ठेवले. वर्तुळाकार खोऱ्यातून तासांचा प्रवास. पहिला थांबा मिर्थीचा. सीमा सुरक्षेसाठी तैनात हिमवीर म्हणजे आयटीबीपीच्या तुकडीचे हे मुख्यालय. येथून धार्चुलामार्गे गुंजीला जायचे होते. तीन दिवसांत पायी ४० किमी चढाई करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, अचानक बदललेल्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी वाहतूक रोखण्यात आली. रस्ता मार्ग कधी खुला होणार हे कोणालाच माहीत नव्हते. यावर हेलिकॉप्टर हा एकमेव उपाय होता. सबसिडीवरील हेलिकॉप्टर सेवा पर्वतीय क्षेत्रातील ग्रामस्थांना उन्हाळ्यात तीन-चार महिने ने-आण करते. यानंतर महत्प्रयासाने इच्छित स्थळी पोहोचलो.

देशात पहिल्यांदाच महिला सैनिकांना १७ हजार फूट उंचीवर गस्त आणि तळावर तैनाती मिळाली आहे. विशेष म्हणजे जगात सर्वात कठीण तीर्थक्षेत्र कैलास मानसरोवरच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या आयटीबीपीच्या महिला सैनिक आहेत. उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल, हिमाचल किंवा लडाखपेक्षाही ही त्यांची सर्वात खडतर तैनाती. ९० हजार अधिकारी जवानांच्या या निमलष्करी तुकडीत केवळ १६०० महिला आहेत. दलातील ८० टक्के सैनिक प्रत्येक वेळी समुद्रसपाटीपासून अति उंचावर तैनात असतात. तिथे उन्हाळ्यातील तापमान उणे असते. हिवाळ्यात उणे ४० अंशांपर्यंत तापमान घसरते.

या तुकडीचे कमांडिंग ऑफिसर महेंद्र प्रताप यांनी ११ वर्षे लडाखमध्ये ड्यूटी केली. उत्तराखंडमधील भूभागही लडाखपेक्षा कमी खडतर नाही, असे सांगितले जाते. इथे त्यांच्या महिला तुकडीतील सैनिक २५ किलो सामग्रीचे ओझे पाठीवर घेऊन ४० किमी अंतर पायी कापत छावणी गाठते. यात बऱ्याच ठिकाणी ७० अंश कोनातून चढाई करावी लागते. काही ठिकाणी रस्ता एवढा अरुंद की थोडा जरी तोल गेला तर हजार फूट खोल दरीत जाण्याची स्थिती. भारत अाणि नेपाळमधील नैसर्गिक सीमा असणारी ही नदी आहे. मानसरोवर यात्रेचा सर्वात कठीण टप्पा लिपुलेख खिंड आहे. १७००० फूट उंचीवरील या खिंडीत महिला तुकडी अपार धैर्याच्या जोरावर तैनात आहे. एका गस्त पथकात तीन महिला सैनिकांना संधी मिळते. या तैनातीचे आकर्षण एवढे की एकदा संधी मिळाल्यानंतर पुन्हा तिथे जाण्याची ओढ कायम राहते. असिस्टंट कमांडंट प्रकाश जेना पहिल्या पेट्रोलिंग पार्टीचे लीडर होते. त्यांनी सांगितले की, पथकात १२ सदस्य होते. जेवढे तास पुरुष ड्यूटी करतात तेवढ्याच महिलाही करतात. जवान काहीसे इकडे तिकडे करतील मात्र महिला ड्यूटीवरच असतात. स्वत:ला बळकट करण्यासाठी दररोज त्या १० किमी हिमपर्वतावर चढाई करतात.

बातम्या आणखी आहेत...