आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लेडी पोलिस ऑफिसरने का लपवले तोंड, जाणून घ्या का म्हणाली कृपया माझे फोटो काढु नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम हटविण्यासाठी या महिला एसआयने एक लाखाची लाच मागितली होती. - Divya Marathi
बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम हटविण्यासाठी या महिला एसआयने एक लाखाची लाच मागितली होती.
मेरठ- एका महिला मंगळवारी आपले तोंड लपवत कॅमरामॅनला विनंती करत होती की, कृपया माझे फोटो काढू नका. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने मंगळवारी या महिला एसआयला 20 हजाराची लाच स्वीकारताना पकडले होते. एका गुन्ह्यात बलात्काराचे कलम हटविण्यासाठई तिने एक लाखाची लाच मागितली होती.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती कशी लागली 
 
- या महिला एसआयचे नाव अमृता यादव आहे. सध्या ती मेरठ शहरातील कोतवाली येथे सेवेत होती. अना मजहर नावाच्या एका महिलेने आपला पती आणि त्याच्या नातलगांविरुध्द हुंड्यासाठी छळाची तक्रार केली होती. त्यानंतर कलम 377 आणि 376 नुसार दाखल करण्यात आला होता.
- या घटनेचा तपास एसआय अमृता यादव करत होती. तिने महिलेचा पती समीर याच्याकडे कलम 377 आणि 376 हटविण्यासाठी एक लाखाची लाच मागितली होती.
- समीरने याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने यादवला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. 
- त्यानंतर समीर हा केमिकल लावलेल्या नोटांसह लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमसह  बुढाना गेट पोलिस चौकीत पोहचला. अमृता यादवने ही रक्कम स्वीकारताच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तिला पकडले. 
बातम्या आणखी आहेत...