कानपूर - मंदिरात चोरी करताना सोमवारी एका महिला चोराला रंगेहाथ पकडण्यात आले. गर्दीतील महिलांनी तिला बुकलून काढले. एवढ्या थापडा मारल्या की तिने वठणीवर येऊन चोरी केलेली पर्स काढून दाखवली.
असे आहे प्रकरण...
- ही घटना किडवाई नगर परिसरातील बारादेवी मंदिरातील आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मोठी यात्रा असते. ही यात्रा 15 दिवस सुरू असते.
- मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रन्नो नावाच्या महिलेने अगोदर नौबस्ता येथील मन्नूदेवी यांची पर्स चोरी केली. त्यात 2 हजार रुपये होते. यानंतर ती राखीदेवी यांची पर्स चोरत होती, तितक्यात चाहूल लागल्याने राखी यांनी पाहिले असता तिला रंगेहाथ पकडले. मग या चोर महिलेला जबरदस्त मारहाण करण्यात आली.
- तिच्याकडून चोरलेल्या पर्सही हस्तगत करण्यात आल्या. मारहाण करून तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
- त्या चोर महिलेसोबत आणखी दोन जणी होत्या, पण हिला पकडल्यामुळे त्या पळून गेल्या.
काय म्हणतात पोलिस?
- किडवईनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी शेष नारायण मिश्रा यांनी सांगितले, एका महिलेला अटक करण्यात आली आहे, तिची चौकशी सुरू आहे. तिच्या साथीदारांचाही शोध घेतला जात आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...