आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरदासपूर: 3 दहशतवाद्यांना ठार मारायला का लागले 12 तास, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चमकीदरम्‍यान पंजाबमधील पोलिस. - Divya Marathi
चमकीदरम्‍यान पंजाबमधील पोलिस.
गुरदासपुर(पंजाब) - पंजाबच्‍या गुरदासपूरमध्‍ये काल (सोमवार) दहशवादी हल्‍ला झाला. दहशवाद्यांशी लढण्‍यासाठी आर्मीचे जवान घटनास्‍थळी दाखल झाले होते. मात्र, या चकमकीदरम्‍यान पोलिस आणि आर्मीमध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून आला. दरम्‍यान, पोलिसांनी आर्मीची मदत घेतली नाही. त्‍यामुळेच हे ऑपरेशन तब्‍बल 12 तास चालले
पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी रद्द केली पाकिस्तानीच्‍या हाय कमिश्नर सोबतची मीटिंग
पंजाबचे मुख्‍यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पाकिस्तानचे हाय कमिश्नर अब्दुल बासित यांच्‍यासोबत मीटिंग आयोजित केली होती. पण, या हल्‍ल्‍यामुळे त्‍यांनी ती रद्द केली. सूत्रांच्‍या माहि‍तीनुसार, पाकिस्तान हाय कमिश्नरने पंजाबच्‍या सीएमसोबत मीटिंग करण्‍यासाठी वेळ मागितला होता. 29 जुलैला ही भेट होणार होती. मात्र, मुख्‍यमंत्र्यांनी ती रद्द केली.
डीजीपींने स्‍वत: केले नेतृत्‍व
सकाळी 5.20 वाजता दीनानगर पोलिस ठाण्‍यावर हल्‍ला झाला. तीन दहशवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यास पोलिसांना 12 तास लागले. या ऑपरेशनचे नेतृत्‍व स्‍वत: डीजीपी सुमेध सैनी यांनी केले. मात्र, पोलिस दलामध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून आला. एवढेच नाही तर घटनास्‍थळी आलेल्‍या आर्मीची मदत घेतली नाही. दहदशवाद्यांनी ठाण्‍यात घुसताच पोलिस कर्मचारी रामलाल आणि संतरी यांना गोळी मारली. पोलिसांना काय होतेय, हे कळायाच्‍या आताच एसएचओ मुख्त्यार सिंह यांनाही दहशवाद्यांनी गोळी घातली. नंतर पोलिस ठाण्‍याच्‍या मागे असलेल्‍या होमगार्ड कक्षात दहशवादी पोहोचले आणि 3 होमगार्डंना त्‍यांनी मारून टाकले. याच ठिकाणी लपून त्‍यांनी सायंकाळपर्यंत फायरिंग केली.
आर्मीला बोलावले आणि केवळ बसवून ठेवले
सकाळी 7 वाजता एसपी बलजीत सिंह यांच्‍या नेतृत्‍वात दहशवाद्यांच्‍या विरुद्ध ऑपरेशन सुरू झाले. दुपारी 12 वाजतापर्यंत आयजी ईश्वर चंद आणि डीजीपी सुमेध सिंह सैनी घटनास्‍थळी दाखल झाले. सकाळी 8:15 वाजता पठानकोटवरून आर्मी कमांडो आले. नंतर आणखी तुकडी बोलावण्‍यात आली. पण, चकमकीसाठी पोलिसांनी आर्मी अधिका-यांना पाठवण्‍याऐवजी पोलिस आणि अमृतसरवरून आलेल्‍या स्पेशल काउंटर सेलच्‍या टीमला मध्‍ये पाठवले. त्‍यांनीच शेवटपर्यंत दहशवाद्यांसोबत फायरिंग केली. ऑपरेशनदरम्‍यान पोलिसांनी बॅरिकेट लावले होते.
आर्मीने बोलावले होते पॅरा कमांडो
सैन्‍यदलाच्‍या अधिका-यांनी सांगितले, या ऑपरेशसाठी हिमाचल प्रदेशातील नाहन येथून आर्मीचे फर्स्ट पॅरा कमांडो बोलवण्‍यात आले होते. पण, परिसरात खाली केल्‍यानंतरच ते ही मोहीम संभाळू शकले असते. तसे झाले असते तर ते केवळ 2 ते 3 घंट्यातच हे ऑपरेशन संपवू शकले असते.
दहवादी देत होते पाकिस्तान जिंदाबादचे नारे
ऑपरेशन संपल्‍यानंतर पंजाब पोलिस दलाच्‍या स्वॅट टीमच्‍चा सदस्‍यांनी सांगितले की, एनकाउंटरदरम्‍यान दहशतवादी धार्मिक आणि पाकिस्तान जिंदाबादचे देत होते.पोलिस उपनिरीक्षक आनंदकुमार यांनी सांगितले, एसपींना गोळी लागल्‍यानंतर दहशवाद्यांनी हे नारे दिले.
शहिद पाेलिसांच्‍या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत
या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्‍याची घोषणा पंजाब सरकार आज (मंगळवार) केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटो...