आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललितगेट : प्रियंका गांधी, रॉबर्ट वढेराही लंडनमध्ये मोदींना भेटले !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - आयपीएलचे घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदींचा वाद आता गांधी कुटुंबीयांपर्यंत पोहोचला आहे. ‘गांधी कुटुंबीयांशीही आपले जवळचे संबंध आहेत. लंडनमध्ये आपण प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वढेरा यांची दोन वेळा भेट घेतली होती,’ असा दावा मोदींनी ट्विटरवरून केला.

यामुळे आतापर्यंत बचावात्मक पवित्र्यातील भाजपला काँग्रेसवर हल्ला करण्याची संधी मिळाली. दोन्ही पक्ष आता परस्परांकडे स्पष्टीकरण मागत आहेत. दरम्यान, प्रियंकांनी मोदींशी भेटीचा इन्कार केला आहे. मोदी यांच्यानुसार, ही भेट ऑक्टोबर २०१३ आणि २०१४ मध्ये झाली होती.

‘छोट्याकडून मोठ्या मोदींचा बचाव ’: प्रियंका, रॉॅबर्ट यांनी ललित मोदींची सार्वजनिकरीत्या कधीही भेट घेतली नाही. ‘छोटे मोदी’ ‘मोठ्या’ मोदींना वाचवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे रणदीप सूरजेवालांनी केला.

‘प्रत्यर्पणाला गांधी कुटुंबीयांची आडकाठी’
‘गांधी कुटुंब ललित मोदींच्या संपर्कात का होते याचे उत्तर सोनिया गांधींनी द्यावे. ब्रिटन ललित मोदींच्या प्रत्यर्पणासाठी तयार होते. तरीही तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ब्रिटनकडून त्यांचे प्रत्यर्पण नको होते. त्यांना कोण रोखत होते? गांधी कुटुंबीयच, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ललित मोदींनी केलेले ट्विट्स...