आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदीच्या कागदपत्रांत मोदी- शाहपासून राष्ट्रपतींच्या सेक्रेटरीचेही नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो-एका मॅच दरम्यान नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि ललित मोदी. - Divya Marathi
फाइल फोटो-एका मॅच दरम्यान नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि ललित मोदी.
मुंबई - सुषमा स्वराज यांच्याकडून मदत घेल्यानंतर चर्चेत आलेले आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदींनी आता या वादात राष्ट्रपती भवनाच्या सेक्रेटरीचे नामही घेतले आहे. तसेच त्यांनी वेबसाईटवर एकापाठोपाठ एक ट्विट, मेल आणि कॉल रेकॉर्डस् पोस्ट केले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचेही नाव आहे. दरम्यान काळ्या पैशासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT ने मंगळवारी ED कडून ललित मोदींच्या खात्यांबाबत माहिती मागवली आहे.

हजारो कागदपत्रे केली सार्वजनिक
आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले मोदी ट्विटमध्ये म्हणाले की, सर्वात मोठा हवाला विवेक नागपाल चालवतात. त्यांना ओमिता पाल यांचे बॅगमॅन (चुकीच्या कामांसाठी पैसे गोळा करणारे) म्हणून ओळखले जाते. त्यांच्या विरोधात अनेक आरोप आहेत. त्याची चौकशी कोणीच करणार नाही का? त्याचे कारण काय ? बड्या हस्ती त्यांचे मित्र आहेत म्हणून का? ओमिता पॉल या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सेक्रेटरी आहेत. ललित मोदींनी एकापाठोपाठ एक हजारो डॉक्युमेंट्स सार्वजनिक केले आहेत. त्या आधारावर चौकशी करण्याचे आव्हानच त्यांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ED) दिले आहेत.

मोदी-राजस्थान रॉयल्स यांची बैठक...
lalitmodi.com या वेबसाईटवर सार्वजिनक केलेल्या या कागदपत्रांमध्ये मोदींनी अनेक लोकांवर आरोप केले आहेत. याच कागदपत्रांबरोबर एक ई मेलही आहे. सप्टेंबर 2009 मधील हा मेल त्यांनी राजस्थान रॉयल्स (आरआर) ला दिलेल्या एका उत्तराचा आहे. त्यात ते त्यांच्या (आरआर) आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) चे नवे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्यात बैठक करण्याबाबत उल्लेख आहे.

आयपीएल-4 वादाच्या दुसऱ्या दिवशी शहांना फोन
या जाहिरातींमध्ये ललित मोदी यांनी त्यांचे फोनबिल आणि कॉल लिस्टही सार्वजनिक केली आहे. 2010 मध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान करण्यात आलेले हे कॉल आहेत. याच यादीत अमित शहांचे नाव सापडले आहे. सात मार्चच्या सकाळी 10.55 वाजता त्यांची तीन मिनिटे चर्चा झाली होती. योगायोग म्हणजे हा कॉल आयपीएल-4 मध्ये दोन नव्या संघाच्या समावेशानंतर झालेल्या वादाच्या दुसऱ्या दिवशीच करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...