आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींच्या नव्या डावाने BCCI अचंबित, लंडनमध्ये बसून RCA मध्ये मुलाची एंट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी मीनल आणि मुलगी व मुलासोबत ललित मोदी. - Divya Marathi
पत्नी मीनल आणि मुलगी व मुलासोबत ललित मोदी.
जयपूर - राजस्थान क्रिकेट असोसिएशनने आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांच्या मुलाची- रुचिर मोदी याची अलवर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी गुपचूप निवड केली आहे. ललित मोदीने मुलाच्या माध्यमातून राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये केलेल्या एंट्रीमुळे बीसीसीआयही आचंबित झाली आहे. विशेष म्हणजे, रुचिरला अलवर प्रेसिंडेंट करणाचे गुपित आरसीएने तब्बल 20 दिवस लपवून ठेवले. सोमवारी दैनिक भास्करने याचा खुलासा केला, तेव्हा राजस्थान क्रिकेट असोसिएशनला सायंकाळी घाई गडबडीत रुचिर मोदीची अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करावे लागले.

- ललित मोदीच्या या गुगलीने बीसीसीआय चकरावून गेली आहे. ललित मोदी आरसीएचे अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयने आरसीए बरखास्त केले होते.
- आरसीए बरखास्त करुन बीसीसीआयने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र मोदीने मुलाची क्रिकेटमध्ये एंट्री करुन नवा डाव खेळला आहे. कारण बीसीसीआयचा विरोध मोदींना आहे त्यांच्या मुलाला नाही.
- आता ललित मोदीने मुलाला अलवर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष करुन पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ते मुलाला आरसीएचेही अध्यक्ष करतील, अशी शक्यता आहे.
पुढील स्लाइडमध्ये, आरसीए काय म्हणाले...
> पहिले मौन आता स्वागत
> 20 दिवस लपवून ठेवला निर्णय
> मोदी लंडनमध्ये बसून झाले होते अध्यक्ष, मुलगाही अलवरला आला नाही
> अशी असेल नवी कार्यकारिणी
बातम्या आणखी आहेत...