आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरी-वसुंधरा राजेंची भेट, भाजपचा पूर्ण पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - ललित मोदी प्रकरणात सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. भाजप तसेच केंद्र सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राजे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

राजे यांनी काहीही चुकीचे कृत्य केलेले नाही. अशा मुद्द्यावरून खरे तर राजकारण करण्याचा अजिबात प्रयत्न व्हायला नको. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाला कोणताही आधार नाही. कायद्याने तसेच तर्क किंवा नैतिकदृष्ट्या त्यात काहीही तथ्य दिसून येत नाही. म्हणूनच काहीही चूक नसताना त्यांच्यावर केेवळ आरोप केले जात आहेत, असे रस्ते आणि वाहतूक मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.

दुष्यंत यांना क्लीन चिट, जेटली लक्ष्य : वसंुधरा राजे यांचे पुत्र तथा खासदार दुष्यंत यांना क्लीन चिट दिल्यावरून काँग्रेसने सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, सरळ सरळ सारवासारव करण्याचा प्रकार आहे. दुष्यंत सिंह यांना वाचवण्यासाठी जेटली तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आम्ही आरोप करतो. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडी अर्थ मंत्रालयाच्या आधीन असताना जेटली यांनी वसुंधरा यांच्या मुलास क्लीन चिट का दिली?
बातम्या आणखी आहेत...