लखनौ (उत्तरप्रदेश) - राजकारणातील दोन दिग्गज रविवारी नातेवाईक झाले. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा नातू मैनपूरीचे खासदार तेजप्रतापसिंह आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी विवाह बंधनात अडकणार आहेत. रविवारी दुपारी लालू यादव मुलायमसिंहाच्या लखनौ येथील निवासस्थानी शगुन घेऊन गेले. शगुनाचा कार्यक्रम झाल्यानंतर साखरपुडा आणि इतर कार्यक्रम कुठे होणार हे ठरले. दिल्लीतील घिटोरनी येथे खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या शकुंतला फार्म हाऊसवर 16 डिसेंबर रोजी साखरपुडा होईल. त्यानंतर मुलायमसिंह यांच्या सैफई येथे कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे.
तेजप्रतापसिंह यादव हे उत्तरप्रदेशातील मैनपुरीचे खासदार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत मुलायमसिंह येथुन विजयी झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत तेजप्रताप येथून विजयी झाले. राजलक्ष्मी लालू यादव यांच्या नऊ अपत्यांमधील सर्वात धाकटी आहे.
16 डिसेंबर रोजी साखरपूडा
लालू यादव यांना तुमची मुलगी राजलक्ष्मीचा हिच्या लग्न कधी होणार, असे विचारले असता त्यांनी त्यांच्या खास बिहारी शैलीत म्हटले, 'आम्ही यादव आहोत... पंडितजी सांगतील विवाहाचा मुहूर्त. त्यांना जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी होईल लग्न.'
मुलायमसिंह म्हणाले, आम्ही सर्व एकच
लखनौमधील 5, विक्रमादित्य मार्गावरील मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी रविवारी शगुन देण्यात आला. यावेळी समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते.
या नव्या नात्याविषयी मुलायमसिंह यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, लग्न माझ्या घरी आहे, बातमी सर्व चॅनलवर सुरु आहे. संसदेतही पत्रकार हाच प्रश्न विचारत आहेत. लालूजी आणि आमच्यात जुने नाते आहे. मध्यंतरी काहीसा दुरावा आला होता. आता मात्र आम्ही सर्व एक आहोत.
माध्यमांशी बोलताना लालू यादव म्हणाले, मुलायसिंहासोबत आमचे नाते आता आणकी घट्ट झाले आहे. ते तयार करत असलेली तिसरी आघाडी यामुळे आणखी मजबूत होईल. ते म्हणाले, 'आम्ही सगळेजण जातीयवादी शक्तींविरोधात लढणार आहोत. मुलायमसिंह या नव्या आघाडीचे प्रमुख असतील. त्यांचा आदेश सगळ्यांना मंजूर असेल. काळ्यापैशाविरोधात 22 डिसेंबर रोजी आमची आघाडी जंतर-मंतरवर धरणे देणार आहे.'
लालू यादवांचे जावई होते उपस्थित
लालूप्रसाद यादव यांच्यासोबत त्यांचा मुलगा तेजस्वी यादव, मित्र आणि खासदार प्रेमचंद गुप्ता, व्याही जितेंद्र यादव, शिवकुमार यादव आणि कॅप्टन बी.एन.यादव होते. लालू यादव यांचे जावई शैलेश, विक्रम, राहुल आणि चिरंजीव हे देखील शगुन देण्यासाठी उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर, कोण आहे तेजप्रतापसिंह आणि आणखी फोटोज्