आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू म्हणाले, मोदींनी शपथेमध्ये अक्षुण्णऐवजी अक्षण्ण वाचले, पुन्हा घ्यावी Oath

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
पाटणा - राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. लालूंनी ट्विटरवर लिहिले की, देशात फूट पाडण्याचा यांचा अजेंडा आहेच कारण त्यांनी देशाची एकता आणि अखंडता काय ठेवण्याची शपथ तर घेतली नाही. मोदींनी शपथेमध्ये अक्षुण्णएेवजी अक्षण्ण असे म्हटले होते. त्याचमुळे ही शपथ काहीही कामाची नव्हती. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा शपथ घ्यायला हवी. अक्षण्ण या शब्दाचा हिंदीत काहीही अर्थ नाही. लालूंनी ट्विटरवर मोदींच्या शपथविधीचा व्हिडिओदेखिल शेअर केला आहे. यामध्ये मोदी अक्षण्ण म्हणाले असल्याचे जाणवते.

मुलावर टीकेने लालू नाराज
शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी लालूप्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाने चूक केली होती. शपथ घेताना तेज प्रतापने 'अपेक्षित' ला 'उपेक्षित' असे वाचले होते. त्यावेळी राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी त्याला थांबवले होते. उपेक्षित नव्हे तर अपेक्षित असते असे सांगत पुन्हा शपथ घ्यायला लावली होती. त्यावर तेज प्रताप यांनी मापी मागत पुन्हा शपथ घेतली होती. यावरून होणाऱ्या टीकेवर लालू नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

पत्रकार ओम थानवी यांची फेसबूक कमेंट...
लालूंचा मुलगा तेज प्रतापने शपथ घेताना चूक केली. राज्यपालांनी त्याला टोकले एक शब्द सुधारण्यास सांगितले आणि आणखी एक सुधारणाही केली. चांगलेच केले. पण आता परंपरा कायमच झाली आहे तर चुकलेल्या इतर शपथांमध्येही सुधारणा व्हायला हव्या. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात ज्याठिकाणी अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते, त्या शपथेदरम्यान एक चूक केली होती. त्यांनी अक्षण्ण म्हटले होते. त्याचा काहीही अर्थ नाही. त्यामुळे या शपथेमध्ये "अक्षण्ण" चालणार नाही त्याला "को अक्षुण्ण" करावे लागेल. करायला पाहिजे, नाही तर उद्या कोणीतरी म्हणेल पंतप्रधानांनी देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याची शपथच घेतली नाही. घेतली होती का?