आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी दोन मुलींनी लालूंना केले आजोबा, तेजप्रतापने FB वर शेअर केले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीसा भारती आणि तेजप्रताप यादव यांनी फेसबुकवर नवजात बाळांचे फोटो पोस्ट केले आहेत. - Divya Marathi
मीसा भारती आणि तेजप्रताप यादव यांनी फेसबुकवर नवजात बाळांचे फोटो पोस्ट केले आहेत.
पाटणा (बिहार) - माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव एकाच दिवशी दोन नातांचे अजोबा झाले. त्यांचे चिरंजीव आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव आणि राज्यसभा खासदार डॉ. मीसा भारती यांनी फेसबुकवरुन ही माहिती दिली आहे. मिसा आणि तिची लहान बहिण राजलक्ष्मीला मुलगा झाला आहे.

फेसबुकवर शेअर केले नवजात बाळाचे फोटो...
- राज्यसभा खासदार मीसा भारती यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर नवजात बाळांचे फोटो शेअर केले.
- त्यांनी लिहिले आहे, की बुधवारी सकाळी त्यांना पुन्हा एकदा आई होण्याचे सौभाग्य मिळाले. त्यांनी लिहिले, 'आज सकाळी आमच्या कुटुंबात एका छोट्या सदस्याने 'मासूमियत' आणि हळुवारपणे प्रवेश केला.' मीसा यांना 14 वर्षांची दुर्गा आणि 7 वर्षांची गौरी या दोन मुली आहेत. हे त्यांचे तिसरे आपत्य आहे.
राजलक्ष्मीचे पहिले बाळ
- मोठी मुलगी मीसाने तिसऱ्या आपत्याला जन्म दिला तर दुसरीकडे लालूंची कनिष्ठ कन्या राजलक्ष्मीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.
- राजलक्ष्मीचा विवाह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे नातू मैनपूरीचे खासदार तेजप्रताप यादव यांच्यासोबत 10 मार्च 2016 ला झाला.
- लालूंच्या दोन्ही मुलींची डिलिव्हरी वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहे. एकीची दिल्लीत तर दुसरीची पाटण्यातील हॉस्पिटलमध्ये.
मीसा लालूंची लाडकी
- राबडी देवी आणि लालू यादव यांच्या नऊ मुला-मुलींमध्ये (7 मुली आणि 2 मुले ) मीसा भारती ही लालूंची सर्वात लाडकी मुलगी आहे. एका टीव्ही शोमध्येही त्यांनी हे मान्य केले होते.
- कदाचित त्यामुळेच त्यांनी केंद्रीय राजकारणात मीसा यांना आपली उत्तराधिकारी म्हणून प्रमोट केले आहे.
- मीसा यांना नुकतेच राज्यसभा सदस्यत्व मिळाले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाटलीपूत्र मतदारसंघातून त्या पराभूत झाल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण आहे राजलक्ष्मीचा पती...
> तेजप्रताप आणि मीसा यांची FB पोस्ट
> लालू यादव यांचे कुटुंब
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...