आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RJD चे नवव्यांदा अध्यक्ष बनले लालू, पटनामध्ये काफिल्यासाठी 45 मिनट बंद होते रस्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना: आरजेडीच्या राष्ट्रीय संम्मेलनात लालू प्रसाद यादव यांना 9 व्यां दा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. जगदानंद सिंह ने याची घोषणा केली. यानंतर श्रीकृष्ण मेमोरियल हॉलसाठी लालूंचा काफीला निघाला. 6 किमी दूर असलेले अंतर कापण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागला. रस्ते बंद असल्यामुळे लोकांची चांगलीच भांबेरी उडाली. लालूंच्या काफील्याच्या पाठीमागे 25 बाइक एस्कॉर्ट करत होती.

आरजेडीच्या सदस्यांनी केले लालूंचे जंगी स्वागत
- लालूंच्या 10 सर्कुलर रोड येथे असलेल्या बंगल्यापासून ते संमेलनाचे ठिकाण असलेल्या श्रीकृष्ण मेमोरियल (SKM) हॉल पर्यंत सदस्यांनी त्यांचे भारी स्वागत केले.

- आठ ठिकाणी वेलकम गेट बनवले होते, या ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

नागरीकांची पंचाईत झाली.
- पटनामध्ये रोड बंद होताच लोकांनी गांधी मैदानाकडे जाण्याचे प्रयत्न केले. ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली.
- संमेलनात संपूर्ण देशातून 700 पाहूणे आले होते.

पुढील स्लाईडवर पाहा, संमेलनाचे इतर फोटो...