आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad Yadav Attacked Back On PM Narendra Modi

लालू म्हणाले, मोदी ब्रह्म पिशाच्च, मिर्चीची धुरी देऊन बिहारमधून पळवून लावू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रह्म पिशाच्च असल्याचे वकत्व्य केले. लालू म्हणाले, मला शैतान म्हणारे मोदी ब्रह्म पिशाच्च आहेत. आम्हाला त्यावर उपाय माहिती आहे. पिवळी मोहरी आणि मिर्चीची धुरी देऊन बिहारमधून पळवून लावू.

यादववंशी असल्याने शिवी दिली : लालू
लालू म्हणाले नरेंद्र मोदींनी शैतान म्हणत मला शिवी दिली आहे. मी यादव वंशातील आणि मागास असल्यामुळेच शिवी दिल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी माझ्याबरोबरच बिहारच्या सर्व मागास आणि गरीब बांधवांचा अपमान केला आहे. लालू म्हणाले माझा पक्ष मोदींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. लालू म्हणाले निवडणूक आयोगाने पंतप्रधानांच्या भाषणाची तपासणी करावी आणि बिहार निवडणुकीत त्यांना प्रचार करण्यास मज्जाव करावा. मी सभेमध्ये चर्चा केली तर माझ्यावर केस झाली. नोटीस पाठवली. आम्ही त्याचे उत्तरही दिले. आता मोदींवरही कारवाई व्हायला हवी.

काय म्हणाले होते मोदी...
मोदींनी गुरुवारी बिहारमध्ये चार ठिकाणी सभांमध्ये भाषण केले होते. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, ते काय-काय खाण्याबाबत बोलत आहेत. लालूंनी यादव वंशाला शिवी दिली आहे. त्यांचा अपमान केला आहे. लालू म्हणतात शैतान त्यांच्या अंगात घुसला. पण शैतानाला संपूर्ण जगात लालुंचा पत्ताच कसा मिळाला.