आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालुंचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले विश्वास नसल्यामुळे जेडीयूला मंत्रिमंडळात 'ठेंगा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलांचे निमित्त साधून लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा नितीश कुमारांवर आगपाखड केली आहे. भाजपला नितीश कुमारांवर विश्वास नाही, त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांना ठेंगा दाखवला असल्याचेही लालू म्हणाले. पाटणा येथे झालेल्या एका रॅलीत नितीश कुमारांवर लालुंनी हा हल्ला चढवला. 
 
आणखी काय म्हणाले लालू.. 
- नितीश कुमारांनीच स्वतः सांगितले आहे की, त्यांच्याशी मंत्रिपदाबाबत काहीही चर्चा झाली नाही, म्हणजे यांना भावच दिला नाही. 
- आमच्याकडे नितीश कुमारांना जो मान होता, तो तिकडे मिळणार नाही, असेही लालू म्हणाले. 
- मंत्रिपद न देण्यामागचे कारण फक्त आम्हाला माहिती आहे. मीडियालाही माहिती नाही. 
- नितीश भाजपवर विश्वास करायला तयार नाहीत, आणि भाजपलाही नितीश यांच्यावर विश्वास नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...