आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad Yadav Daughter Rajlakshmi Marriage Invited To 1001 Guest News In Marathi

लालु प्रसाद यादवांच्या कन्येच्या शाही विवाहाचे 1001 व्हीआयपींना निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालु प्रसाद यादव यांची कन्या राजलक्ष्मी हिच्या विवाहाचे व्हीआयपी पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्याचे काम सुरु आहे. देशातील 1001 विशेष अतिथींना विवाहाला निमंत्रित कण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवी दिल्लीतील चाणक्यपुरीमधील अशोका हॉटेलमध्ये हा शाही विवाह येत्या 26 फेब्रुवारी होणार आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे नातू आणि खासदार तेजप्रताप सिंह यांच्यासोबत राजलक्ष्मीचा विवाह निश्चित झाला आहे. उत्तरप्रदेशातील ईटावामधील सैफई गावात येत्या 21 फेब्रुवारी 'शुभ तिलक' होणार आहे. सैफई हे मुलायम सिंह यांचे मूळ गाव असून कार्यक्रमाला बिहारमधून हजारों पाहुणे जाणार आहे.
'शुक तिलक' सभारंभाचे राजद कार्यालय आणि पाटणा येथील निवासस्थानाहून जदयू आणि कॉंग्रेसच्या पाहुण्यांना फोन वरून निमंत्रित केले जात आहे. राजद, जदयू आणि कॉंग्रेसचे सर्व विद्यमान आणि माजी एमपी-एमएलए-एमएलसी, जिल्हाध्यक्ष, प्रदेश आणि जिल्हा पक्षाचे पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आल्याचे राजदचे महासचिव चितरंजपन गगन यांनी सांगितले आहे.
1001 व्हीआयपींना ‍पाठवले निमंत्रण...
राजलक्ष्मी-तेजप्रताप यांच्या विवाहला 12 दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशोका हॉटेलमध्ये होणार्‍या या शाही विवाहाला वधु-वर पक्षांतर्फे देशातील 1001 व्हीआयपी पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचे काम सुरु आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, लालुंची कन्या आणि होणार्‍या जावयाचे फोटो...